बनावट प्रमाणपत्रांद्वारे लंडनला जाणार्‍या महिलेवर गुन्‍हा नोंद

बनावट प्रमाणपत्राच्‍या आधारे लंडनला जाणार्‍या वैशालीबेन पारेख यांना विमातळावर अडवण्‍यात आले. त्‍यांच्‍या शैक्षणिक प्रमाणपत्रावर स्‍वाक्षरी असलेले कुलगुरु त्‍या कालावधीत विद्यापिठात कार्यरत नव्‍हते. या प्रकरणी महिलेच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.

नंदुरबार येथील तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांवर गुन्हा नोंद !

जिल्हाधिकार्‍यांनी शासनाची फसवणूक करणे म्हणजे ‘कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार’ होय !

मृत सनदी लेखापालाच्या विवरणपत्रावर ६० कोटींचा ठेका !

मृत व्यक्तीच्या नावाने कामात भ्रष्टाचार करणार्‍या दोषींना कठोर शिक्षा केली पाहिजे ! यात मोठी टोळी कार्यरत आहे का ? याचीही चौकशी व्हायला हवी !  

छत्रपती संभाजीनगर येथील ज्ञानोबा अर्बन क्रेडिट सोसायटीला कुलूप; ठेवीदार हवालदिल !

क्रेडिट सोसायटीत शेकडो ग्राहकांची फसवणूक झाली आहे. सिडको एन्-२ येथील सोसायटीला कुलूप लावून संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी पसार झाले आहेत.

सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांतील प्रस्तावित खनिज प्रकल्प वाचवण्यासाठी उप वनसंरक्षकांचे खोटे प्रतिज्ञापत्र !

वनसंरक्षक हेच आता वनभक्षक बनले आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि माजी नगरसेवक डॉ. जयेंद्र परूळेकर अन् असनिये गावचे माजी सरपंच संदीप सावंत यांनी केला आहे.

अभिनेते अमिताभ बच्‍चन यांच्‍या विरोधात ‘कॅट’ची केंद्रशासनाकडे तक्रार !

विज्ञापनातून जनतेची दिशाभूल केल्‍याप्रकरणी ‘जनरल कॉन्‍फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’चे (कॅट) सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी ज्‍येष्‍ठ अभिनेते अमिताभ बच्‍चन यांच्‍या विरोधात ग्राहक व्‍यवहार, अन्‍न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय यांच्‍याकडे तक्रार केली आहे.

गृहमंत्र्यांच्‍या नावे स्‍थानांतराचे बनावट आदेश काढणार्‍या महंमद इलियास याला अटक !

महाराष्‍ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी विद्याधर महाले यांचे इमेल हॅक करून आणि थेट गृहमंत्र्यांच्‍या स्‍वाक्षरीचा उपयोग करून स्‍थानांतराचे बनावट आदेश काढणार्‍या महंमद इलियास याला सायबर पोलिसांनी मिरज येथून अटक केली आहे.

पुणे येथे ‘२० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करून देतो’, असे सांगून महिलेची फसवणूक !

यातून हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती आवश्‍यक आहे, हे लक्षात येते.

नागपूर येथील बुकी अनंत उपाख्‍य सोंटू जैन याचा जामीन अर्ज उच्‍च न्‍यायालयाने फेटाळला !

व्‍यावसायिक विक्रांत अग्रवाल यांची ‘ऑनलाईन गेमिंग’द्वारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा बुकी (जुगारात पैज लावणारी व्‍यक्‍ती) अनंत उपाख्‍य सोंटू जैन याचा जामीन अर्ज मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपिठाने २६ सप्‍टेंबर या दिवशी फेटाळला.

येरवडा कारागृह प्रशासनाला बंदीवानाने २६ लाखांहून अधिक रुपयांना फसवले !

येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानाने कारागृहातील अधिकार्‍याची खोटी स्वाक्षरी करून ‘मनीऑर्डर’ पुस्तिकेमध्ये फेरफार करून २६ लाख ६९ सहस्र ९११ रुपयांची फेरफार करून फसवणूक केली आहे.