धर्मांतरविरोधी कायदा केव्हा होणार ?

अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ने प्रसिद्ध केलेल्या एका सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये ‘भारतामध्ये सर्वाधिक धर्मांतर हिंदूंचे झाले आहे’, असे म्हटले आहे. त्यातही हिंदूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याची टक्केवारी सर्वाधिक आहे.

पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करा !

तालिबानी आतंकवाद्यांची कुटुंबे इस्लामाबादमध्येच रहातात, तसेच तालिबानी आतंकवाद्यांवर पाकिस्तानी रुग्णालयांत उपचारही केले जातात, अशी स्वीकृती पाकचे मंत्री शेख रशिद अहमद यांनी दिली आहे.

ट्विटरवर बंदी केव्हा घालणार ?

ट्विटरच्या ‘ट्वीप लाईफ’ या ‘करियर’संबंधी भागामध्ये दाखवण्यात आलेल्या जगाच्या मानचित्रामधील भारताच्या मानचित्रामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भाग दाखवलेला नाही.

पाकचे अस्तित्व नष्ट कधी करणार ?

पाकपुरस्कृत जिहादी आतंकवाद्यांनी ड्रोनच्या साहाय्याने जम्मू येथील विमानतळावर तैनात असलेल्या भारतीय वायूदलाच्या लढाऊ हेलिकॉप्टर्सचा नेम धरून बॉम्ब आक्रमण केले. सुदैवाने बॉम्ब हेलिकॉप्टर्सवर पडण्याऐवजी इमारतीवर पडल्याने मोठी हानी टळली.

अशा धर्मांधांना कठोर शिक्षा कधी होणार ?

वडोदरा (गुजरात) येथील समीर कुरेशी याने स्वतःचे नाव ‘सॅम मार्टिन’ असल्याचे सांगून हिंदु महिलेशी मैत्री केली. शारीरिक संबंध ठेवत तिची आक्षेपार्ह स्थितीतील छायाचित्रे काढून विवाह करण्यास बाध्य केले. विवाहानंतर त्याचा खोटेपणा उघडकीस आला.

विदेशी सामाजिक माध्यमांची दादागिरी मोडून काढा !

भारताचे केंद्रीय माहिती अन् तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर खाते ट्विटरकडून १ घंट्यासाठी बंद करण्यात आले होते. नंतर ट्विटरने रविशंकर प्रसाद यांना चेतावणी देऊन ते पुन्हा चालू केले.

असे व्हायला कानपूर पाकमध्ये आहे का ?

कानपूर (उत्तरप्रदेश) येथील कर्नलगंज भागामधील अल्पसंख्यांक हिंदू बहुसंख्य मुसलमानांच्या दहशतीमुळे घर विकून पलायन करण्याच्या सिद्धतेत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हिंदूंनी त्यांच्या घराबाहेर ‘घर विकणे आहे’, असे फलक लावले आहेत.

व्हॅटिकन चर्च यावर उत्तर कधी देणार ?

व्हॅटिकन चर्चने जगभरातील चर्चमध्ये लहान मुलांचे होणारे लैंगिक शोषण आणि अत्याचार करणार्‍यांना पाठीशी घातले, असा आरोप संयुक्त राष्ट्रांसमवेत काम करणार्‍या स्वतंत्र मानवाधिकार तज्ञांनी केला आहे.

अशा कसायांना फाशीची शिक्षा करा !

वलसाड (गुजरात) येथे अवैधरित्या गोवंशांची वाहतूक करणार्‍या एका टेम्पोतील धर्मांध कसायांनी हार्दिक कंसारा या २९ वर्षीय गोरक्षकाला वाहनाखाली चिरडून ठार मारले. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे.

धर्मांतरित हिंदूंची ‘घरवापसी’ करा !

‘प्रेरक विचार’च्या (‘मोटिवेशनल थॉट’च्या) गोंडस नावाखाली उत्तरप्रदेशातील १ सहस्र गरीब हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या दोघा मौलानांना उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे.