छत्रपती संभाजी महाराज बलीदानदिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानद्वारे मुंबई आणि ठाणे येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन !
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानदिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मुंबईतील दहिसर आणि शीव येथे, तर ठाणे येथील वामनराव ओक रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरांमध्ये प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी केला.