जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांनी अग्नीसुरक्षेचे लेखापरीक्षण करून घेण्याचा विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा आदेश !

रुग्णालयांमध्ये शॉर्टसर्किट किंवा इतर कारणांमुळे आगीच्या घटना घडू नयेत, यासाठी शासकीय आणि खासगी रुग्णालयांचे अग्नीसुरक्षा लेखापरीक्षण होणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

जगभर थैमान घालणार्‍या कोरोना विषाणूपासून बाणूरगड मात्र मुक्त !

शासनाच्या नियमांचे पालन केल्यास स्वतःचे पर्यायाने गावाचे रक्षण होऊ शकते, याचा आदर्श बाणूरगड गावातील लोकांनी सर्वांसमोर ठेवला आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापुरात श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव साधेपणाने साजरा !

पारंपरिक वाद्यांचा गजर, मोजके मानकरी, तोफेची सलामी, तसेच श्रीपूजकांच्या उपस्थितीत मंदिर परिसरात हा उत्सव साजरा करण्यात आला.

सोलापूर येथे युवकाने आत्महत्या केल्याप्रकरणी ५ सावकारांविरुद्ध गुन्हा नोंद !

किशोर चव्हाण हे खासगी नोकरी करत होते. दळणवळण बंदीमुळे पगार वेळेत होत नसल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी काम सोडले होते.

अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत जागा न उरल्याने मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात येणार !

पुणे शहरात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नाही.

डॅशबोर्डवर उपलब्ध खाटांची माहिती न देणार्‍या रुग्णालयांवर होणार कारवाई !

कोरोना साथीत रुग्णांना सहजरित्या खाटांची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी डॅशबोर्ड कार्यान्वित केला आहे.

जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड रुग्णालयामुळे रुग्णांना दिलासा ! – बाळासाहेब पाटील 

बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, शासनाने कडक निर्बंध घातलेले असले, तरी  नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. याचा परिणाम रुग्णवाढीवर होत आहे.

कोरोना रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना भोजनाचे डबे पोच करण्याचे कार्य आम्ही कर्तव्य म्हणून करणार ! – नितीन चौगुले, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान

देसाई – ९४०५५ ५४०४०, चेंडके ९५७९२ ७६१११, निकम – ९४०५४ ०२६२६, तसेच मोहिते ९४२३२ ६८५५८, विशाल चव्हाण – ८०८७१ २१२६१ यांना संपर्क साधावा.

पर्यटकांना सत्तरीतील उस्ते बंधार्‍यावर प्रवेश न देण्याचा नगरगाव पंचायतीचा निर्णय

२६ एप्रिलपासून कोणाही बाहेरील व्यक्तीला सत्तरी तालुक्यातील उस्ते बंधार्‍यावर प्रवेश दिला जाणार नाही.

सिंधुदुर्गातील कोरोनाविषयीच्या अन्य घडामोडी कणकवलीत आणखी एक लसीकरण केंद्र चालू करण्याची शिवसेनेची मागणी

ज्येष्ठ आणि दुर्धर आजाराने ग्रस्त नागरिकांना प्राधान्याने लस देण्याची मागणी