पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांना ‘सद्गुरु’ म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांनी त्यांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !  

सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता आणि अखंड ईश्वरी अनुसंधानात असलेले पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ हे ‘सद्गुरु’पदी विराजमान झाल्याचे आश्रमातील फलकाद्वारे घोषित करण्यात आले. त्यांचे एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.

हरितालिका व्रत भावपूर्ण केल्याने पूजक आणि पुरोहित यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे

या चाचणीत हरितालिका-पूजनाची मांडणी, पूजक (सौ. शकुुंतला जोशी) आणि पुरोहित (श्री. सिद्धेश करंदीकर) यांच्या पूजनापूर्वी आणि पूजनानंतर ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.

पू. दीक्षितआजोबा यांच्या देहत्यागाची स्वप्नाच्या माध्यमातून मिळालेली पूर्वसूचना आणि पू. वामन यांनी ‘पू. आजोबा नारायणाकडे (परात्पर गुरु डॉक्टरांकडे) गेले’, असे सांगणे

पहाटे मला स्वप्नात दिसले, ‘एका ठिकाणी पुष्कळ साधक एकत्रित झाले आहेत . . . ‘ही कुणाच्या अंत्यविधीची सिद्धता चालू आहे ?’ हे पाहून मला भीती वाटली नाही. अंत्यविधीचे दृश्य असूनही मनाला चांगले वाटत होते. यावरून मला वाटले, ‘ते एखाद्या उन्नतांच्या अंत्यविधीची सिद्धता करत आहेत.’

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्या कार्यालयात सेवेसाठी गेल्यावर संभाजीनगर येथील अधिवक्ता उमेश भडगांवकर यांना आलेल्या अनुभूती

सनातनचे ९८ वे संत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांचा आज नारळी पौर्णिमा (३.८.२०२०) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने अधिवक्ता उमेश भडगांवकर यांना त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती प्रस्तुत करीत आहोत.

साधनेच्या बळावर आपत्काळाला सहजतेने सामोर्‍या जाणार्‍या पू. माई !

‘प.पू. दास महाराज सूक्ष्मातील वाईट शक्तींशी लढा देण्यासाठी रामनाथी आश्रमात गेले आहेत, तर पू. (सौ.) माई स्थूल देहाने आश्रमातील नित्यक्रम करत असतात आणि सूक्ष्म देहाने श्रीगुरुचरणी लीन होऊन साधना करतात’, असे आम्हाला जाणवते.

पू. वामन राजंदेकर (वय १ वर्ष ११ मास) आणि त्यांची ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून  पृथ्वीवर जन्माला आलेली बहीण कु. श्रिया राजंदेकर (वय ९ वर्षे) यांच्यातील आध्यात्मिक स्तरावरील दैवी नाते !

फोंडा (गोवा) येथील पू. वामन राजंदेकर आणि त्यांची बहीण कु. श्रिया राजंदेकर यांच्यात भावा-बहिणीचे कौटुंबिक नाते नसून आध्यात्मिक नाते आहे. आज रक्षाबंधनानिमित्त त्यांच्या आईने त्यांच्यातील अशा या आगळ्या-वेगळ्या नात्यातील उलगडलेले विविध पैलू इथे प्रस्तुत करीत आहोत.

अशा आमच्या प्रेमळ हर्षेमावशी ।

‘कर्णावती (गुजरात) येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शीला श्रीपाद हर्षे, म्हणजेच हर्षेमावशी (वय ८१ वर्षे) माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. त्यांच्यातील गुण आणि सेवेची तळमळ पाहून मला त्यांच्याविषयी पुढील कविता सुचली.

सौ. रंजना गडेकर यांना त्यांची आत्या सौ. रोशनी बुडगे यांच्या मृत्यूपूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे

‘माझी आत्या (सौ. रोशनी (ललिता) बुडगे (वय ५९ वर्षे) (ओटवणे, सावंतवाडी) हिचे ७.१२.२०१९ या दिवशी निधन झाले. माझ्या आत्याने जीवनात पुष्कळ त्रास भोगला आहे. ३५ वर्षांपासून तिला मानसिक त्रास होता. तिचा हा जन्म जणू त्रासदायक प्रारब्धभोग भोगून संपवण्यासाठीच झाला होता.

सनातनचे साधक पुरोहित सिद्धेश करंदीकर यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

मे २०१९ मध्ये झालेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त सनातनचे साधक पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर आलेल्या अनुभूती या लेखात दिल्या आहेत.