ब्रह्मांडनायक परात्पर गुरु डॉक्टर ।

साधकांना भवसागरातून पार करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

कुणा आवडे खट्याळ कृष्णरूप ।
कुणा आवडे सावळे रामरूप ॥
कुणा आवडे शेषशायी विष्णुरूप ।
परि मला आवडे गोजिरे परम पूज्य(टीप १) रूप ॥ १ ॥

सौ. गौरी अभिजीत कुलकर्णी

कान्हासम जे खट्याळ असती ।
गोपींच्या जे मनात वसती ॥
कृपा करूनी मधुर हसती ।
गीतेसम ज्ञानामृत पाजती ।
असे परम पूज्यच मज भावती ॥ २ ॥

राघवासम निश्‍चल शांत असती ।
मूढ साधका वानरासम कृपाछत्र देती ॥
असंख्य संकटांत जे स्थिर रहाती ।
भवसागर पार करूनी साधका तारती ।
असे परम पूज्यच मज भावती ॥ ३ ॥

श्रीविष्णुसम जे भूवैकुंठी रहाती ।
हाक मारता भक्तासाठी धावूनी येती ॥
जन्मजन्मांतरी साधकां रक्षिती ।
अखिल ब्रह्मांडांचे जे पालन करती ।
ते परम पूज्यच मज भावती ॥ ४ ॥

भक्तराजांचे शिष्योत्तम असती ।
साधकांचा प्राणच असती ॥
मातेपरी साधकांचे लालन-पालन करिती ।
प्रेमळ हास्ये जे मना मोहिती ।
असे परम पूज्यच मज आवडती ॥ ५ ॥

अज्ञानी मी घोर पातकी ।
परात्पर गुरूंचा महिमा मी न जाणी ॥
ओळखू न शके थोरवी त्यांची ।
कर्तेपण जे श्रीकृष्णास देती ।
असे देवरूप परम पूज्य मज आवडती ॥ ६ ॥

‘परम पूज्य’ या शब्दांतच ‘प्रीती’ ।
‘परम पूज्य’ या शब्दांतच ‘भक्ती’ ॥
‘परम पूज्य’ शब्दे हरे भीती अन् मिळे शक्ती ।
परम पूज्यांमध्येच असती सर्वही नाती ।
असे परम पूज्य मज आवडती ॥ ७ ॥

श्रीविष्णुरूपी परात्पर गुरु डॉक्टर ।
श्रीकृष्णरूपी परात्पर गुरु डॉक्टर ॥
श्रीरामरूपी परात्पर गुरु डॉक्टर ।
श्री सत्यनारायणरूपी परात्पर गुरु डॉक्टर ॥ ८ ॥

दत्तरूपी परात्पर गुरु डॉक्टर ।
गुरुदेवरूपी परात्पर गुरु डॉक्टर ॥
सनातनरूपी परात्पर गुरु डॉक्टर ।
साधकरूपी परात्पर गुरु डॉक्टर ॥ ९ ॥

त्रैलोक्य भरूनी असती परात्पर गुरु डॉक्टर ।
चराचरी असती परात्पर गुरु डॉक्टर ॥
कणाकणांमध्ये असती परात्पर गुरु डॉक्टर ।
असे ब्रह्मांडनायक परात्पर गुरु डॉक्टर ॥ १० ॥

टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले

– सौ. गौरी अभिजीत कुलकर्णी, पुणे (१.५.२०२०)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक