भाव म्हणजे देवाच्या प्रीतीचा महासागरच असतो ।

भाव म्हणजे केवळ भावच असतो । त्यात कुठेही बुद्धीचा अडथळा नसतो ॥
‘हे का आणि ते कसे ?’, असे भावात नसते ।
भावात केवळ देवाची प्रीती अनुभवायची असते ॥

भाववृद्धी सत्संग घेतांना साधिकेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सूक्ष्मातील उपस्थितीची अनुभूती येणे

भावप्रयोग घेत असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्याकडे पहात आहेत’, असे मला वाटले. त्यानंतर माझ्या मनावरील ताण न्यून झाला. त्या वेळी ‘प्रत्येक भाववृद्धी सत्संग हा परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग आहे.

श्रीविष्णूची आपल्यावर असलेली दृष्टी अनुभवून तशी प्रेमळ दृष्टी निर्माण करण्यासाठी साधकांनी केलेले प्रयत्न !

‘भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून भगवंताने सत्संगात सर्व साधकांना अमूल्य भेट दिली ती, म्हणजे भावदृष्टी ! त्यानुसार प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि चराचर सृष्टी यांकडे पहाण्याचे ध्येय भावसत्संगातून सर्वांना दिले होते. त्यानुसार साधकांनी केलेले प्रयत्न येथे दिले आहेत.