बुद्धीपलीकडील कार्यकारणभाव ठाऊक नसणारे बाल्यावस्थेतील विज्ञान !
‘एखादी घटना घडली की, विज्ञान ती घडण्यामागील केवळ भौतिक कारणांचा अभ्यास करते. त्यामागे काही कार्यकारणभाव असतो, हे विज्ञानाला अद्याप कळलेले नाही
‘एखादी घटना घडली की, विज्ञान ती घडण्यामागील केवळ भौतिक कारणांचा अभ्यास करते. त्यामागे काही कार्यकारणभाव असतो, हे विज्ञानाला अद्याप कळलेले नाही
गुरुदेव आणि गोविंद (ईश्वर) हे दोघे आपल्यासमोर उभे राहिल्यावर प्रथम कुणाचे चरण धरावे ? तर गुरुदेवांचेच चरण धरावे, म्हणजे त्यांना प्रथम वंदन करावे; कारण गुरुदेवांच्या कृपेने गोविंद (ईश्वर) दर्शन देतो.
‘बुद्धीप्रामाण्यवादी धर्माचा वरवरचा अभ्यास करतात आणि ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ या म्हणीनुसार धर्माच्या विरोधात बोलतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘हिंदु धर्मग्रंथांमध्ये ज्ञानाचा अनमोल असा ठेवा आहे. त्यात जीवनातील सर्व समस्यांवर उपाययोजना दिल्या आहेत, तरीही आज हिंदू पाश्चात्त्य विचारसरणी आणि तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नरत आहेत.’
जिज्ञासूला ‘त्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अनेक साधनामार्गांपैकी कोणता मार्ग आवश्यक आहे ?’, हे लक्षात घेऊन त्याला त्या मार्गातील संतांकडे एकही संत पाठवत नाहीत. संतांच्या या वागण्यावरून ‘त्यांना स्वतःचा योगमार्ग सोडून इतर साधनामार्ग आहेत, हेही ज्ञात नसते का ?’, असा प्रश्न पडतो.’
‘बाबरपासून आतापर्यंतच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप इ. थोडे धर्मप्रेमी सोडले, तर बाकी सर्व हिंदू राजे हिंदु धर्माविषयी प्रेम नसलेलेच होते. आजही हीच स्थिती आहे; म्हणून कोट्यवधी हिंदू मूठभर धर्मांध आक्रमकांसमोर हरतात !’
हिंदु धर्माच्या विरोधात कोणीही काहीही बोलले, तरी तो ‘विचारवंत’ किंवा ‘बुद्धीप्रामाण्यवादी’ ठरून त्याचे कौतुक केले जाते. याला ‘हिंदूंच्या धर्माभिमानाचा अभाव’ म्हणावे कि ‘हिंदूंच्या सहिष्णूतेचा अतिरेक’ म्हणावे ?’
‘स्वातंत्र्यापासून आजवर कोणत्याही पक्षाचे राज्यकर्ते आाणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी हिंदूंना धर्मशिक्षण दिले नाही. त्यामुळे आता हिंदूंना केवळ ‘रामायण, महाभारत’ हे शब्दच माहीत आहेत. त्यातील एकही शिकवण त्यांना आठवत नाही.’
बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या लक्षात येत नाही की, त्यांच्या चुकीच्या विचारांमुळे समाजाची दिशाभूल होत आहे आणि ते विचार आचरणात आणल्यामुळे समाजाचीही अधोगती होत आहे आणि समाजात रज-तम यांचे प्रमाण वाढत आहे.
‘हिंदूंमध्ये प्रदेशानुसार भाषा, जेवण, वेश इत्यादी सर्वकाही निराळे आहे. त्यांच्यामध्ये सामायिक आहे, तो केवळ धर्म ! आता हिंदूंनी धर्मच सोडल्यामुळे हिंदूंमध्ये ऐक्य राहिलेले नाही.’