उत्तम नियोजनकौशल्य असणारे आणि कर्तेपणा देवाला अर्पण करणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निनाद गाडगीळ !

निनाददादाकडे अनेक सेवांचे दायित्व असूनही तो लहान-थोर सर्वांना समजून घेऊन त्यांच्या अडचणींविषयी आवश्यक ती उपाययोजना सांगतो. त्यामुळे सर्वांना त्याचा आधार वाटतो.

ब्रह्मकुंडली आणि ब्रह्मरंध्र

ब्रह्मरंध्र आणि ब्रह्मकुंडली हे एकच असून त्यात भेद नाही. काही उन्नत साधू-संतांच्या देहत्यागाच्या वेळी त्यांच्या ब्रह्मरंध्रामधून प्राणज्योत बाहेर पडते. ब्रह्मरंध्रालाच ब्रह्मकुंडलीनीचक्र असेही म्हणतात.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने !

व्यवहारात लोकांना कार्य करण्यासाठी पदाची किंवा कोणाच्या तरी ओळखीची आवश्यकता लागते, तर साधकांना साधनेत पुढे जाण्यासाठी देवाच्या कृपेची आवश्यकता असते.

ध्यानाचे लाभ आणि तोटे

ध्यानामुळे व्यष्टी साधना होते; पण समष्टी साधना होत नाही – परात्पर गुरु डॉ. आठवले

अंतर्मुख, सेवाभावी आणि इतरांना साहाय्य करणारे ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुणे येथील श्री. महेश पाठक !

मी काही कालावधीसाठी पुणे सेवाकेंद्रात रहात होते. त्या वेळी मला श्री. महेश पाठक यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

साधना हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनला पाहिजे ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, सनातन संस्था

हे शिबिर होण्याच्या अगोदर धर्मप्रेमींसाठी कार्यशाळा झाली. त्या कार्यशाळेत सहभागी असणारे १५ जण या शिबिरात सहभागी झाले होते. या शिबिरात वडील-मुलगा, आई-मुलगी असे कुटुंबियही सहभागी झाले होते !

रुग्णाईत असतांनाही सतत अनुसंधानात राहिल्याने आनंदी असलेले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले नाशिक येथील पू. महेंद्र क्षत्रीय (वय ६९ वर्षे) !

फाल्गुन कृष्ण पक्ष अष्टमी (२५.३.२०२२) या दिवशी नाशिक येथील सनातनचे ४३ वे संत पू. महेंद्र क्षत्रीय यांचा ६९ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांची मुलगी कु. सिद्धी क्षत्रीय यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाचे प्रतिरूप असणार्‍या पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी यांच्या घरी आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि सिंगबाळ कुटुंबातील व्यक्तींची जाणवलेली भाववैशिष्ट्ये !

फोंडा, गोवा येथील पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी यांच्या घरातील श्री गणेश आणि श्री अन्नपूर्णामाता यांच्या मूर्ती पालटून नवीन मूर्ती स्थापन केल्या. तेव्हा पू. नीलेश सिंगबाळ यांनी त्यांची पूजा केली. त्यानंतर ७.२.२०२२ या रथसप्तमीच्या दिवशी आम्हा काही साधकांना त्या मूर्तींचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

वाराणसी सेवाकेंद्रातील साधिका (कु.) सुनीता छत्तर यांना उकळत्या पाण्याने भाजल्यावर आलेल्या अनुभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती वाटलेली कृतज्ञता !

माझ्या तोंडवळ्यावर भाजले होते; परंतु माझ्या मनात कोणताही नकारात्मक विचार आला नाही. मला मनातून गुरुदेवांविषयी ‘केवढे मोठे संकट टाळून त्यांनी माझे रक्षण केले आहे’, अशी पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

अशीच राहो गुरुदेवा, तुमची अखंड कृपा ।

मला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शांतीविधी झाला. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला सुचलेली कविता पुढे दिली आहे. ‘गुरुदेवा, अशीच तुमची कृपा असू दे’, ही प्रार्थना !