काम बंद असतांना पाण्याचे नमुने घेऊन अहवाल सादर करणार्‍या पुरातत्व विभागाला नमुने पुन्हा घेऊन अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे निर्देश

‘हिंदूंचे आराध्यदैवत प्रभु श्रीराम यांनी निर्माण केल्याचा इतिहास असलेला वाळकेश्‍वर येथील बाणगंगेचा जलस्रोेत विकासकांनी केलेल्या खोदकामामुळे बाधित झाला आहे.

गोध्रा हत्याकांडाप्रकरणी नरेंद्र मोदी क्षमा मागतील का ? – नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

राहुल गांधी यांनी चुकीविषयी क्षमा मागितली, ही चांगली गोष्ट आहे; मात्र काँग्रेसने केलेल्या चुकीविषयी जर खरोखरच त्यांना पश्‍चात्ताप वाटत असेल, तर त्यासाठी काँग्रेस काय प्रायश्‍चित्त घेणार ? हेही त्यांनी सांगणे अपेक्षित आहे.

पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी पैसे घेऊन मतिमंद मुलीवरील बलात्काराचे प्रकरण दडपले !

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार रामदास कदम यांचा विधान परिषदेत गंभीर आरोप

विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर करण्यासाठी पुढील अधिवेशनापर्यंत मुदतवाढ !

अर्णव गोस्वामी अन् अभिनेत्री कंगना राणावत यांच्या विरोधात ७ सप्टेंबर २०२० या दिवशी प्रविष्ट केलेले हक्कभंग, तसेच अवमान प्रकरणाचा विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर करण्यासाठी पुढील अधिवेशनापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे

कर्नाळा बँकेतील आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी कारवाई करा ! – आमदार प्रशांत ठाकूर

१७ फेब्रुवारी २०२० या दिवशी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात येऊनही कारवाई झाली नसल्यामुळे हातात फलक धरून आमदार ठाकूर यांनी शासनाचा निषेध केला.

बेळगाव सीमाप्रश्‍नावर केवळ प्रतीवर्षी विधीमंडळात बोलणे, ही तेथील मराठी बांधवांची चेष्टा ! – आमदार जयंत पाटील, शेकाप

बेळगावमधील साडेतीन तालुक्यांचा मराठी भाषिकांचा भाग महाराष्ट्रात आला पाहिजे. न्यायालयात आणखी किती दिवस भांडणार ? बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात आला पाहिजे. पूर्वी अधिवेशनाच्या प्रारंभी सीमाप्रश्‍नावर बोलले जात असे.

गोध्रा प्रकरणात नरेंद्र मोदी यांना कोणत्याही अहवालामध्ये दोषी ठरवण्यात आलेले नाही ! – चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजप

गुजरातमधील गोध्रा प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काय संबंध ? मोदी त्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्या वेळी त्यांनी नागरिकांना सुरक्षा पुरवण्याचे काम केले.

राजकीय दबाव असता, तर राज्यपालांनी त्यागपत्राला संमती दिली नसती !

जळगाव आणि लोणेरे विद्यापिठांतील कुलगुरूंनी पदाचे त्यागपत्र दिल्यानंतर मुंबई विद्यापिठातून त्यांच्याशी चर्चा करून त्यागपत्राचे कारण समजून घेतले.

‘एल्.ई.डी.’ मासेमारीच्या बंदीसाठी राज्यशासनाने कायदा करावा ! – आमदार रामदास कदम, शिवसेना

‘एल्.ई.डी.’ लाईट समुद्रात सोडून केल्या जाणार्‍या मासेमारीमुळे मोठ्या माशांसह छोटे मासे सरसकट पकडले जातात. यामुळे छोट्या मासेमारांना मासे मिळत नाहीत. त्यामुळे ‘एल्.ई.डी.’ मासेमारीच्या बंदीसाठी राज्यशासनाने कायदा करावा.

वैधानिक विकास महामंडळांवरून सुधीर मुनगंटीवार यांची हक्कभंगाची मागणी !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्‍वासन पाळले नाही, हा विधानसभेच्या सार्वभौम सभागृहाच्या विशेषाधिकाराचा भंग आहे. त्यामुळे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची सूचना मांडली.