गुरुकृपायोग हा सर्व योगांचा मेरूमणी असणे !

‘गुरुकृपायोग ज्याला कळला आणि वळला, तो सुटला. गुरुकृपायोग हा सर्व योगांचा मेरूमणी आहे. जितके गुरुकृपायोगावर चिंतन आणि मनन करावे, तितके त्याचे अंतरंग उलगडत जाते. गुरुकृपायोग हा ‘यो बुद्धेः परतस्तु सः ।’ म्हणजे ‘बुद्धीच्या पलीकडील स्तरावरील’….

साधना म्हणजे काय ?

गुरु म्हणजे ईश्‍वराचे साकार रूप आणि ईश्‍वर म्हणजे गुरूंचे निराकार रूप या योगातील मुख्य साधना म्हणजे आपले मन, बुद्धी आणि अहं गुरूंना अर्पण करणे, तसेच आपल्या मनाने विचार न करता आणि आपल्या बुद्धीने निर्णय न घेता गुरूंच्या विचाराने अन् निर्णयाप्रमाणे वागणे…

राम नाही, तर मोत्याची माळही कवडीमोलच !

सीतेला समजते की, आपण माळ दिली, असे जे आपल्याला वाटले, ते श्रीरामाचे स्मरण न करताच मी ही माळ दिली. ती हनुमानाची क्षमा मागते. श्रीरामाचे स्मरण करून ती हनुमानाला दुसरी माळ देते. ती माळ हनुमान लगेच गळ्यात घालतो.  

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली साधनेविषयीची मौलिक सूत्रे

‘अपेक्षा करणे’ हे अहंचे लक्षण आहे. अपेक्षापूर्ती झाल्यावर तात्कालिक सुख मिळते; परंतु त्यामुळे अहंचे पोषण होते आणि अपेक्षेप्रमाणे झाले नाही की, दुःख होते.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली साधनेविषयीची मौलिक सूत्रे

जन्मल्यापासून आतापर्यंत प्रत्येक प्रसंगात देवाने मला कसे साहाय्य केले ?’ तसेच ‘तो मला साधनेत सतत साहाय्य करत आहे’, हे आठवून सतत कृतज्ञता व्यक्त करावी.

जीवनात संघर्ष जितका मोठा, तितके यशही मोठे !

जीवनात कराव्या लागणार्‍या संघर्षापुढे गुडघे टेकणार्‍या, प्रतिकूल परिस्थितीला दोष देणार्‍या आणि स्वतःच्या भाग्याची तुलना इतरांच्या भाग्याशी करण्यात वेळ वाया घालवणार्‍यांनी हे लक्षात ठेवावे, ‘जीवनात संघर्ष जितका मोठा, तितके यशही मोठे !

भगवंताची लीला अनुभवून कृतज्ञता व्यक्त करणे

‘मी काहीही खाल्ले, तरी त्याचे रक्त बनते, ही किमया कोण करू शकतो ? माझा प्रत्येक श्‍वास कुणामुळे अखंड चालू आहे ?यांसारख्या प्रश्‍नांची उत्तरे शोधल्यास भगवंताची लीला अनुभवता येऊ शकते. यांसाठी दिवसातून मी किती वेळा कृतज्ञता व्यक्त करतो ?’

मनमोकळेपणा

आपल्या मनातील विचार मोकळेपणाने इतरांना सांगितल्यास विचारांमुळे आपल्याला आलेला ताण अल्प होतो. अशा वेळी ते विचार उत्तरदायी साधकांना सांगून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे.

व्यष्टी साधनेचा पाया भक्कम हवा !

व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही साधनेकडे लक्ष देणार्‍या साधकांवर गुरुकृपेचा ओघ अधिक असतो.