जालना येथे धर्मादाय आयुक्तालयातील निरीक्षकास लाच घेतल्याप्रकरणी अटक !

२३ मे या दिवशी यातील १० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जंघाळे यांना रंगेहाथ पकडून अटक केली.

लष्कराची लेखी परीक्षा देणार्‍या तोतया उमेदवारांना अटक !

मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचा परिणाम ! अशा प्रकारे उत्तीर्ण होण्याचा मार्ग अवलंबणार्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी !

कळमनुरी (जिल्हा हिंगोली) येथील अपघातात ५ जण आणि १९० मेंढ्या ठार

ट्रकचालकाला डुलकी लागल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि समोर उभ्या असलेल्या ट्रकवर त्याचे वाहन आदळले.

पशूवधगृह बंद करण्याच्या अनेक वर्षांच्या मागणीचे निवेदन घेऊन आलेले वृद्ध उपमुख्यमंत्र्यांसमोर कोसळले !

आता तरी त्याची नोंद घेऊन पशूवधगृह बंद करतील का ? राज्यभर सगळीकडे अवैध पशूवधगृहे मोठ्या प्रमाणात आहेत. त्या सर्वांवरच सरकारने काहीतरी कार्यवाही करायला हवी !

 ‘लव्ह जिहाद’चे वास्तव हिंदु जनजागृती समिती कित्येक वर्षे मांडत आहे ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

आपण सर्वांनी जागृत होऊन धर्मशिक्षण घेतले, तरच अशा घटनांना आळा बसेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. ते सावर्डे येथील विठ्ठल मंदिरात २२ मे या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते.

वित्त आयोगाचा १०० टक्के निधी व्यय व्हावा ! – मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा

केंद्र सरकारकडून १५ व्या वित्त आयोगातील ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे. गावाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी हा निधी महत्त्वाचा आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने २८ मे या दिवशी रक्तदान शिबिर !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने २८ मे या दिवशी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि ‘आम्ही ८६ वेल्फेअर असोसिएशन’च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आज-काल विरोधाची परंपरा निर्माण झाली आहे ! – राहुल सोलापूरकर, अभिनेते

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातील कलाकार, तसेच शहरातील चित्रपट, नाट्य आणि अभिनय क्षेत्रांतील कलाकार उपस्थित रहाणार असल्याने पोलीस तैनात केले होते.

‘महावितरण’च्या पुणे परिमंडळामध्ये वर्षभरात २५ कोटी रुपयांची वीजचोरी !

कोट्यवधी रुपयांची वीजचोरी होईपर्यंत परिमंडळ काय करत होते ? चोरी केलेल्यांकडून रक्कम वसूल करण्यासमवेत संबंधित अधिकार्‍यांना शिक्षा म्हणून त्यांच्याकडूनही रक्कम वसूल करावी, असेच जनतेला वाटते !

समष्टीच्या शुद्धीकरणासाठीच सनातन संस्थेचे कार्य चालू ! – विद्याधर नारगोलकर

हिंदूंनी भयावह परिस्थितीमध्ये काय करावे ? याचे मार्गदर्शन सनातन संस्था करते. हे एक प्रकारे समष्टीचे शुद्धीकरणाचेच कार्य चालू आहे. हे कार्य आपले आहे. ‘आता नाही तर परत कधीच नाही’, हे लक्षात घेऊन सर्वांनी दिंडीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.