‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या अंतर्गत सनातनच्या आश्रमांमध्ये ध्वजारोहण !

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या म्हणजे ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रशासनाच्या वतीने १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबवण्यात येत आहे.

हिंदूंवरील जिहादी आक्रमणे अन् महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ‘धार्मिक पक्षपात’ यांविरोधात हिंदु जनजागृती समितीचे भांडुप येथे आंदोलन !

देशभरात विविध ठिकाणी हिंदूंवर होणारी जिहादी आक्रमणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘धार्मिक पक्षपात’ या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भांडुप रेल्वेस्थानकाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.

शिंदे गटाचेही सेनाभवन दादरमध्येच होणार !

मानखुर्द येथे शिंदे गटाचे पहिले कार्यालय झाले आहे. राहुल शेवाळे यांचे हे कार्यालय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सेनाभवन दादरमध्येच बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीची माहिती सदा सरवणकर यांनी १२ ऑगस्ट या दिवशी दिली होती.

रिझर्व्ह बँकेकडून रूपी सहकारी बँकेचा परवाना रहित !

बँकेच्या विलीनीकरणाचे प्रयत्नही चालू होते; मात्र विलीनीकरणाची चर्चा चालू असतांनाच रिझर्व्ह बँकेने रूपी बँकेचा परवाना रहित केला. यामुळे ठेवीदारांना धक्का बसला आहे.

भीमा नदीकाठच्या गावांनी दक्षता बाळगावी !

उजनी आणि वीर धरण यांतून पाण्याचा भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू आहे. भीमा नदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याने नीरा आणि भीमा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ !

कोयना-वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतीपर्जन्यवृष्टी होत असल्याने १२ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून धरणातून १० सहस्र १०० घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू आहे. धरणांमधील विसर्गामुळे आणि मुक्त पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी अंदाजे ३५ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

संभाजीनगर येथे कार्यक्रमात विलंबाने आल्यामुळे केंद्रीय मंत्री डॉ. भागवत यांच्यावर खासदार आणि आमदार यांची टीका !

लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाला वेळेत उपस्थित राहून जनतेसमोर आदर्श ठेवणे अपेक्षित आहे.

खड्डे बुजवण्यासाठी महापालिका केमिकल काँक्रीटचा उपयोग करणार !

महापालिकेने खड्डे बुजवण्यासाठी केमिकल काँक्रेटचा उपयोग चालू केला असून त्यामुळे अल्प वेळात आणि अल्प खर्चात खड्डे बुजवणे शक्य झाले आहे. अल्प वेळात खड्डा बुजवला जात असल्याने वाहतुकीला होणारा अडथळा ही अल्प होणार आहे, असा दावा महापालिकेने केला.

दहावा आरोपी शेख अकील शेख छोटू याला अटक !

उमेश कोल्हे यांनी नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमांवर पोस्ट केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली होती.

संभाजीनगर येथे ‘ईडी’विरुद्ध उद्धव ठाकरे गटाने लावलेले फलक काढले !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाचे जय विश्वभारती कॉलनी शाखाप्रमुख रोहन आचलिया यांनी रोपळेकर, विवेकानंद चौक येथे ‘ईडी’ कारवाईविषयी फलक लावले.