ज्ञानशक्तीच्या आधारे हिंदूंचे प्रभावी संघटन करूया ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

योग्य नियोजनकौशल्य आणि निर्णयक्षमता या गुणांच्या आधारे खर्‍या अर्थाने ‘नेतृत्व विकास’ साधता येतो. त्यामुळे प्रत्येकाने हे गुण स्वत:मध्ये आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

प्रशासकीय अधिकार्‍याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याच्या प्रकरणात माजी राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांचे पुणे येथे निधन !

सातारा येथील राजघराण्यातील शांत आणि संयमी व्यक्तीमत्त्व अशी ओळख असणारे श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांचे पुणे येथे उपचार चालू असतांना १३ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ५.४५ वाजता निधन झाले.

बाजार समितीच्या २१ कोटींच्या भूखंडाच्या व्यवहाराला सत्तारांनी दिलेली स्थगिती न्यायालयाने उठवली

येथील बाजार समितीची जिन्सी येथे १५ सहस्र ६४५ चौरस मीटर जागा आहे. तिचा व्यवहार २१ कोटी ७५ लाख रुपयांमध्ये झाला होता. प्रकरण न्यायप्रविष्ट  झाल्यानंतर न्यायालयानेही व्यवहाराला मान्यता दिली असतांना तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका अर्जावर या व्यवहाराला स्थगिती दिली होती

ठाणे येथे सामाजिक माध्यमांत आमदारांचे आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड केल्याप्रकरणी दोषारोपपत्र प्रविष्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाणे येथे ५ एप्रिल २०२० यादिवशी गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी आता वर्तकनगर पोलिसांकडून ठाणे न्यायालयात १३ सप्टेंबर २०२२ यादिवशी दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून शिंदे गटाचा ‘दसरा मेळावा’ बीकेसी मैदानावर घेण्याचा निर्णय !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील आमदारांची १३ सप्टेंबर या दिवशी बैठक घेतली. त्यामध्ये हा मेळावा वांद्रे कुर्ला संकुल येथील मैदानावर घेण्याचा पर्याय देण्यात आला; कारण शिवसेनेचा ‘दसरा मेळावा’ हा शिवतीर्थावरच होण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आग्रही आहेत.

परीक्षेत ‘शून्य’ गुण मिळाल्याविषयी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाकडे तक्रार !

पेपर लिहूनही विद्यार्थ्यांना शून्य गुण कसे काय दिले गेले ? याचे अन्वेषण लवकर होऊन विद्यार्थ्यांवरील ताण अल्प करणे आवश्यक आहे !

अल्पवयीन आरोपीला प्रौढ आरोपी म्हणून दाखवणार्‍या पोलीस निरीक्षकाची चौकशी करा !

अशा पोलिसांनी त्यांच्या कार्यकाळात ज्या गुन्ह्यांचे अन्वेषण केले, त्या सर्वच गुन्ह्यांचे न्यायालयाच्या निरीक्षणाखाली फेरअन्वेषण करून अशा खाकीतील खंडणीखोरांना कठोर शिक्षा केली, तरच इतरांना जरब बसेल.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला मारहाण करणार्‍या नराधमावर ‘पोक्सो’ अंतर्गत कारवाई करा ! – विहिंप आणि बजरंग दल यांच्या वतीने निवेदन

१० सप्टेंबर या दिवशी चंदूर येथे ॠतिक माणिक शिंदे या नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला दगड आणि उसाचा बुडका यांनी मारहाण केली.

ठाकुर्ली (डोंबिवली) येथे खड्ड्यांमध्ये बसून मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन !

मागील काही मासांपासून ठाकुर्ली (डोंबिवली) पूर्व रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदिर-चोळे गाव रस्त्याची चाळण झाली आहे. या खड्ड्यांमुळे या भागात सतत वाहतूककोंडी होत असते. दुचाकी, रिक्शा, शालेय बसगाड्या, तसेच विद्यार्थ्यांना या वाहतूककोंडीचा सर्वाधिक फटका बसत आहे.