शिकण्याची वृत्ती आणि धर्माभिमान असणारी ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची बेंगळुरू येथील कु. संकीर्तना श्रीवत्सन् (वय १० वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. संकीर्तना श्रीवत्सन् ही या पिढीतील एक आहे !

फाल्गुन कृष्ण एकादशी (२५.३.२०२५) या दिवशी कु. संकीर्तना श्रीवत्सन् हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. संकीर्तना श्रीवत्सन् हिला दहाव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

कु. संकीर्तना श्रीवत्सन्

‘वर्ष २०१७ मध्ये ‘कु. संकीर्तना श्रीवत्सन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२५ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२६.२.२०२५)


‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

१. शिकण्याची वृत्ती

‘कु. संकीर्तनाला नवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असते. तिला वेगवेगळ्या भाषा शिकण्याची इच्छा असते. मी सत्संग आणि धर्मशिक्षणवर्ग घेत असतांना ती लक्ष देऊन ऐकते.

२. ती इतरांना स्वतःहून शक्य तेवढे साहाय्य करते.

सौ. कोमला काशी

३. ती साधक आणि शाळेतील सर्व जण यांच्याशी जुळवून घेते.  

४. देवाची ओढ

तिला मंदिरात जायला आवडते. ‘पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला शक्य होईल तितक्या लवकर जायला हवे’, असे ती म्हणते. ती भक्तांच्या कथा वाचते. ती घरातील देवघर स्वच्छ करते आणि पूजा करते.

५. धर्माचरण करणे

तिला सात्त्विक कपडे घालायला आवडतात. ती कुंकू लावते. ती हातांत बांगड्या घालते आणि इतरांनाही तसे करायला सांगते. तिला प्रत्येक सण आणि उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करायला आवडतो.

६. ती मला सेवेत साहाय्य करते. 

७. धर्माभिमान

तिला अन्य पंथियांनी केलेल्या अत्याचारांविषयी समजल्यावर राग येतो. ती काश्मीर येथे सहलीला गेली असतांना तेथील मंदिरांचे अवशेष पाहून तिने सांगितले, ‘‘आपल्या मंदिरांचे आपण रक्षण करायला हवे.’’

८. व्यष्टी साधनेचे प्रयत्न

ती जेवणापूर्वी आणि अभ्यास करण्यापूर्वी प्रार्थना करते. ती थोडा वेळ नामजपादी उपाय करते.

९. तत्त्वनिष्ठ

ती इतरांना त्यांच्या अयोग्य कृतीची जाणीव करून देते.

१०. गुरूंप्रती भाव 

अ. वर्ष २०२२ मध्ये कु. संकीर्तनाला बर्‍याच शारीरिक अडचणी होत्या. तिला वारंवार सर्दी, खोकला आणि ताप येत असे. एकदा तिला रुग्णालयात भरती करावे लागले होते. तेव्हा तिला सांगितलेले नामजपादी उपाय तिने तत्परतेने आणि प्रामाणिकपणे केले. तिला लगेच गुण आला. तेव्हा ‘हे सर्व गुरुकृपेने झाले’, असे तिने सांगितले.

आ. ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रमय जीवनदर्शन मालिकेतील ग्रंथ आवडीने वाचते.

इ. ती गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव पुनःपुन्हा आठवते.’

– सौ. कोमला काशी (कु. संकीर्तनाची आई), बेंगळुरू, कर्नाटक. (३०.५.२०२४)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.