शनिशिंगणापूर येथे भविष्यातही कारवाई होणार असल्याचे प्रशासनाचे आश्वासन

(लटकू म्हणजे पूजा साहित्याच्या विक्रीतून भाविकांची पिळवणूक करणारे दलाल)
शनिशिंगणापूर (जिल्हा अहिल्यानगर) – येथे शनैश्वर देवाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकाला बळजोरीने अधिक दराने पूजा साहित्य खरेदी करण्यास भाग पाडलेल्या ‘लटकूं’ना पकडण्यात आले. ‘लटकूं’वर प्रथमच गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विलास चव्हाण, ऋषिकेश पवार आणि उद्देश गव्हाणे अशी त्यांची नावे आहेत. भाविकांच्या तक्रारीनंतर यापुढेही ‘लटकूं’वर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. ‘पूजासाहित्य खरेदीची बळजोरी केल्यास साहित्य विक्रेते, मालक आणि वाहनतळ मालक यांच्यावर कारवाई केली जाईल’, अशी चेतावणीही देण्यात आली.
१. शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी येणार्या भाविकांची कोणत्याही प्रकारे लूट होऊ नये; म्हणून उपविभागीय दंडाधिकार्यांनी शनिशिंगणापूर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
२. गावाबाहेरील किंवा गावातील सार्वजनिक रस्ते, चौक, बसथांबे, प्रवेश मार्ग किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दर्शनासाठी येणार्या भाविकांना अथवा त्यांच्या वाहनांना थांबवणे, अडवणे, विशिष्ट ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करणे यावर बंदी आहे.
संपादकीय भूमिका :
|
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत