‘रणरागिणी’ची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मागणी

पणजी, १२ जानेवारी – सध्या सर्वत्र हिंदु बहिणींवर ‘लव्ह जिहाद’ आणि बलपूर्वक धर्मांतराच्या स्वरूपात भीषण सामाजिक आपत्ती ओढवलेली आहे. देशातील उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, झारखंड यांसारख्या ११ राज्यांनी ‘लव्ह जिहादविरोधी’ किंवा ‘धर्मांतरबंदी’ कायदे आधीच लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर बहिणींच्या रक्षणासाठी गोव्यातही तात्काळ ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी ‘रणरागिणी’च्या शिष्टमंडळामध्ये सौ. हेमश्री गडेकर आणि सौ. राजश्री गडेकर यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांना निवेदन देतांना समाजकल्याण मंत्री श्री. सुभाष फळदेसाई आणि गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी यांचीही उपस्थिती होती. गोव्यात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करण्याची मागणी असलेल्या या निवेदनावर ७ सहस्र गोमंतकीय नागरिकांनी स्वाक्षर्या केल्या आहेत.
हिंदु जनजागृती समितीने या निवेदनात गोव्यात घडलेल्या ‘लव्ह जिहाद’शी संबंधित विविध घटनांचा उल्लेख केला आहे. या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.
१. साक्षी, अनुराधा, श्रद्धा यांसह अन्य हिंदु मुलींची हत्या करणार्या लव्ह जिहादींना तात्काळ फासावर लटकवावे.
२. राज्यातून महिला आणि मुली गायब होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना ? याची चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र चौकशी समिती नेमावी.
३. ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे हाताळण्यासाठी वा त्यांचा शोध घेण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारच्या धर्तीवर पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी.
‘रणरागिणी’च्या वतीने आमदार श्री. दाजी साळकर, आमदार श्री. उल्हास तुयेकर, आमदार श्री. प्रवीण आर्लेकर, आमदार श्री. प्रेमेंद्र शेट आणि आमदार डॉ. देविया राणे यांनाही हे निवेदन देण्यात आले. ‘रणरागिणी’ने गोव्यात गेले काही महिने लोकप्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ संघटना, सामाजिक संघटना, महिला स्वयंसाहाय्य गट आदींच्या ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्यासाठी गाठीभेटी घेणे, महिला मेळाव्यांचे आयोजन करणे आदींच्या माध्यमांतून जनजागृती आरंभली आहे.
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली