नागपूर येथे ‘प्रहार समाज जागृती संस्थे’चा उपक्रम

नागपूर, ५ जानेवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन, मोहिमा, युद्धनीती आणि रणनीतिक दूरदृष्टी यांद्वारे विद्यार्थ्यांना भारतीय सैनिकी परंपरेची ओळख व्हावी, यांसाठी ‘प्रहार समाज जागृती संस्थे’च्या वतीने इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाने लष्करी इतिहास’ या अभिनव पाठ्यपुस्तक मालिकेचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला प.पू. स्वामी गोविंददेव गिरि, एअर मार्शल अजित भोसले, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. विजय फणशीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या पुस्तक मालिकेला केवळ शैक्षणिक उपक्रम न समजता ही भारतीय संस्कृती, धर्म आणि राष्ट्रभावना यांचे पुनरुज्जीवन करणारी चळवळ आहे, असे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर महाभारत आणि संतपरंपरा यांचा असलेला प्रभाव अधोरेखित करत त्यांनी शौर्य, धर्म आणि नैतिकता यांचे महत्त्व विशद केले.
‘छत्रपती शिवरायांचा इतिहास देशभरातील शाळांमध्ये व्यापक स्वरूपात शिकवला जाणे आवश्यक आहे. ते युगनिर्माते असून त्यांना कोणत्याही एका प्रदेशापुरते मर्यादित करता येणार नाही’, असे मत लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांनी व्यक्त केले.
पुस्तकांचे लेखन श्री. कार्तिक पाठक, कु. स्वरा ठेंगडी आणि सौ. आयुषी चिकटे चहारे यांनी केले. या महत्त्वाकांक्षी शैक्षणिक प्रकल्पाची संकल्पना प्रहार समाज जागृती संस्थेच्या सचिव फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांची आहे. या सोहळ्याला प्रहार समाज जागृती संस्थेचे विश्वस्त, ‘प्रहार डिफेन्स अकॅडमी’चे कर्मचारी, ‘प्रहार संस्थां’चे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि प्रसारमाध्यमे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.