मनसे न्यायालयात दाद मागणार

मुंबई – महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वीच प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने किंवा काही कारणाने त्यांना माघार घेणे भाग पाडण्यात आल्याने संबंधित उमेदवार संभाव्य निवडणूक जिंकल्याप्रमाणेच आहेत. विविध पक्षांच्या अशा उमेदवारांची संख्या ७० असून त्यात सर्वाधिक भाजपचे आहेत.
या स्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अन्य विरोधकांनी टीका केली आहे. यामध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना पैशांचे अमीष दाखवल्याचे म्हटले जात आहे.
याविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या सभांमध्ये पुराव्यांसह हा विषय मांडणार असल्याचे समजते. या संदर्भात मनसे न्यायालयातही जाणार असल्याची चर्चा आहे, तसेच राज्य निवडणूक आयुक्तांची भेटही घेणार आहे.
संभाव्य बिनविरोध निवड होणार असलेल्यांपैकी ४४ भाजपचे, २२ शिवसेनेचे, २ राष्ट्रवादी काँग्रेसचे, १ इस्लामिक पक्षाचे आणि १ अपक्ष असे उमेदवार आहेत.
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री