खाली येण्यासाठी केली मद्याच्या बाटलीची मागणी
तिरुपती (आंध्रप्रदेश) – येथील श्री गोविंदराजस्वामी मंदिराच्या सुरक्षा कर्मचार्यांचे लक्ष चुकवून मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर मद्य प्राशन केलेला माणूस मंदिराच्या भिंतीवर चढला. तो गोपूरम्वर चढून कळसापर्यंत गेला. हे पाहून मंदिरातील अधिकारी आणि कर्मचारी गोळा झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मंदिर प्रशासनाने तात्काळ पोलीस आणि अग्नीशमन विभाग यांना याची माहिती दिली. गोपूरम्च्या कळसावर चढल्यानंतर मद्यपीने ‘मद्याची बाटली आणून दिली, तरच खाली उतरीन’, अशी अट ठेवली. मंदिरातील दक्षता अधिकार्यांनी त्याची मागणी मान्य केल्यानंतर तो स्वतःहून सुरक्षितपणे खाली उतरला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
🚨 Shocking Incident in Tirupati 🚨
A drunk man climbed the gopuram of the Govindaraja Swamy Temple and demanded a bottle of alcohol to come down🍾❌
⚠️ This is the tragic result of deprived Dharmic education.
🛕 Such acts insult our sacred traditions.
🔐 Strict action must… pic.twitter.com/cPMxDRIDuo
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 3, 2026
या मद्यपीचे नाव कुट्टाडी तिरुपती (वय ४५ वर्षे) असल्याचे सांगितले जाते. तो तेलंगाणाच्या निजामाबाद जिल्ह्यातील कुर्मवाडा येथील पेद्दामल्ला रेड्डी कॉलनीतील रहिवासी आहे. इतर भाविकांप्रमाणेच त्यानेही मंदिरात प्रवेश केला होता.
संपादकीय भूमिका
|

केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !