
पुणे, ३० डिसेंबर (वार्ता.) – ३१ डिसेंबरला मद्यधुंद होऊन गाड्या चालवणे, अपघात होणे, ‘रेव्ह पार्ट्या यांसारखे अपप्रकार होऊ नयेत, यासाठी केडगाव येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २९ डिसेंबर या दिवशी जनजागृतीपर वाहन फेरी काढण्यात आली. या प्रसंगी श्रीराम प्रतिष्ठान चौफुला, नाथभक्त परिवार केडगाव, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच केडगाव, पारगाव येथील ८० कार्यकर्ते उपस्थित होते. या वाहनफेरीचे आयोजन हिंदु राष्ट्र समन्वय समिती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. नागेश्वर मंदिरापासून चालू झालेली ही फेरी आंबेगाव, केडगाव स्टेशन मार्गे बोरमलनाथ मंदिरापर्यंत आली. फेरीमध्ये सर्व जण भगवे ध्वज घेऊन घोषणा देत सहभागी झाले. शेवटी श्री. शुभम लव्हे यांनी मार्गदर्शनपर विचार मांडले.
विशेषश्री. दिग्विजय वरेकर यांनी स्वतःहून जनजागृती करणारा एक ऑडिओ सिद्ध केला आणि वाहनफेरीमध्ये त्याची उद्घोषणा करण्यात आली. |
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
पाणी योजना रखडल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संतप्त !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे लोणंद ते तरडगाव प्रस्थान !
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडले