
मुंबई – विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती एकत्र लढत नसून स्थानिक स्थितीनुसार प्रत्येक राजकीय पक्षांनी एकमेकांशी आघाडी आणि युती केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील येऊ घातलेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुका बहुरंगी होणार आहेत.
राज्यातील महत्त्वाच्या मानल्या जाणार्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली आहे. मुंबईसह ठाणे आणि कल्याण महानगरपालिकेतही भाजप-शिवसेना युती झाली आहे. यांव्यतिरिक्त पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अकोला, मालेगाव आदी महानगरपालिकांमध्ये मात्र शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसनेही सर्व ठिकाणी स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनीही स्वत:चे स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले आहेत.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.