Bengaluru  Demolition : बेंगळुरू (कर्नाटक) येथे ४०० हून अधिक बेकायदेशीर घरे महापालिकेने पाडली !

  • बहुसंख्येने मुसलमानांची घरे असल्याने केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून काँग्रेस सरकारवर टीका

  • सत्य न जाणता कर्नाटकच्या प्रकरणांत हस्तक्षेप करू नका ! – कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांकडून केरळच्या मुख्यमंत्र्यांची कानउघाडणी

बेकायदेशीर झोपड्या आणि घरे पाडली

बेंगळुरू (कर्नाटक) : येथे महापालिकेने ४०० हून अधिक बेकायदेशीर झोपड्या आणि घरे पाडली. यात बहुसंख्य मुसलमानांची घरे होती. यानंतर त्यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे. या संदर्भात केरळमधील साम्यवादी सरकारचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी कर्नाटक सरकारवर टीका केली. यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री विजयन् यांची ‘बेंगळुरूमधील अतिक्रमित भूमीवर करण्यात आलेल्या कारवाईविषयी संपूर्ण माहिती न घेता त्यांनी सार्वजनिकरित्या मतप्रदर्शन केले. अनुभवी नेत्यांनी असे विधान करणे खेदजनक आहे’, अशा शब्दांत कानउघाडणी केली.

उपमुख्यमंत्री शिवकुमार पुढे म्हणाले की, ज्या भूमीची स्वच्छता करण्यात आली, ती प्रत्यक्षात घनकचरा टाकण्याची जागा होती आणि त्यामुळे परिसरात आरोग्यासाठी धोके निर्माण झाले होते. तेथे रहाणार्‍यांना दुसरीकडे स्थलांतर करण्याची संधीही देण्यात आली होती. अशा विषयांत बाह्य राज्यातील नेत्यांनी हस्तक्षेप करू नये. काही गट नंतर सरकारी भूमीवर बेकायदा नियंत्रण मिळावण्याचा प्रयत्न करतात; मात्र हे सहन केले जाणार नाही. पात्र लाभार्थ्यांना राजीव गांधी योजनेतून घरे उपलब्ध करून दिली जातील. सार्वजनिक भूमीवर कुणालाही नियंत्रण मिळवू दिले जाणार नाही.

संपादकीय भूमिका

मुसलमानप्रेमी काँग्रेस सरकारकडून मुसलमानांची बेकायदेशीर घरे पाडली जातात आणि या कारवाईला मुसलमानप्रेमी साम्यवादी सरकारचा मुख्यमंत्री विरोध करतो, हीच मोठी घटना आहे !