इस्रायलमध्ये नमाजपठण करणार्‍या तरुणावर सैनिकाने चढवली गाडी !

सैनिकाला अटक !

नमाजपठण करणार्‍या तरुणावर गाडी चढवताना इस्रायली सैनिक

तेल अविव (इस्रायल) – इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील वेस्ट बँक भागामध्ये रस्त्याच्या कडेला नमाजपठण करणार्‍या पॅलेस्टिनी युवकावर एका इस्रायली राखीव सैनिकाने जाणीवपूर्वक  चारचाकी एटीव्ही गाडी चढवली. अचानक झालेल्या धडकेत तो खाली कोसळला आणि वाहनाचा काही भाग त्याच्या अंगावरून गेला. हा युवक थोडक्यात बचावला. त्याने आक्षेप घेताच त्याला खडसावून पळवून लावण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे.

व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर या सैनिकाला अटक करून ५ दिवसांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. यापूर्वीही त्याने गावात गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

या घटनेमुळे टीका होत आहे; मात्र त्याच वेळी सीरियामध्ये मशिदीत नमाजपठण केले जात असतांना बाँबस्फोट घडवून आणला गेल्याची घटना घडली. यात ६ हून अधिक जण घायाळ झाले. म्हणजे मुसलमानच मुसलमानांना नमाजपठण करतांना बाँबस्फोट घडवून ठार मारतात, अशा घटना अनेकदा घडल्या आहेत आणि घडत आहेत; मात्र अशा घटनांचा कधीच कुणी निषेध करत नाही !