|

मुंबई – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही भागांत ‘उत्तर भारतीय बटोगे, तो पिटोगे’ (उत्तर भारतियांनो, विभाजित झालात, तर मार खाल) असे लिखाण असलेले फलक लावण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकरणी ‘उत्तर भारतीय विकास सेने’चे सुनील शुक्ला यांना प्रत्युत्तर देत पोस्ट प्रसारित केली. त्यात ते म्हणाले, ‘‘मराठीचा अवमान केलात, तर ‘नही बटोगे, तो भी पिटोगे’ (मराठीचा अवमान केल्यास, जरी तुम्ही विभाजित झाला नाहीत, तरी मार खाल) ‘मराठी माणसाचा अवमान सहन केला जाणार नाही’, हा संदेश देण्यासाठीच मी सामाजिक माध्यमांवर पोस्ट केली आहे.’’
संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, हा वाद ‘मराठी विरुद्ध उत्तर भारतीय’ असा नसून जाणीवपूर्वक राजकीय लाभासाठी तो निर्माण केला जात आहे. उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाणीवपूर्वक हा वाद पेटवला जात आहे. मुंबईकरांच्या भावना, भाषा आणि अस्मिता यांचा वापर केवळ मतांसाठी केला जात आहे. मराठी माणूस कुणाच्या विरोधात नाही; पण त्याच्या स्वाभिमानावर आघात झाला, तर उत्तर देणे अपरिहार्य ठरेल.
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !