बेंगळुरूमधील वास्तूविशारद के. रघुनाथ यांच्या रहस्यमय मृत्यूचे प्रकरण

बेंगळुरू (कर्नाटक) – सुमारे ६ वर्षांनंतर शहरातील वास्तूविशारद के. रघुनाथ यांच्या रहस्यमय मृत्यूशी संबंधित प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) आंध्रप्रदेशातील तेलुगु देसम्चे माजी खासदार डी. के. अदिकेसवुलु नायडू यांचा मुलगा डी.ए. श्रीनिवास, मुलगी डी.ए. कल्पजा आणि कर्नाटक पोलीसदलातील उपअधीक्षक एस्.व्हाय. मोहन यांना अटक केली आहे. मालमत्तेच्या वादातून हा खून करण्यात आल्याचे समजते.
१. के. रघुनाथ हे माजी खासदार नायडू यांचे जवळचे सहकारी मानले जात होते; पण वर्ष २०१९ मध्ये व्हाइटफिल्ड येथे एका अतिथीगृहामध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. प्रारंभी हे प्रकरण आत्महत्येचे मानले गेले होते; पण नंतर त्यांची पत्नी आणि मुलगा यांनी या मृत्यूविषयी संशय व्यक्त केला होता आणि चौकशी करण्याची मागणी केली होती.
२. ‘सीबीआय’ने सांगितले की, आरोपींना गुन्हेगारी षड्यंत्र, फसवणूक, पुरावे नष्ट करणे आणि बनावट पुरावे सिद्ध करणे यांसारख्या गंभीर आरोपांखाली अटक करण्यात आली आहे.
३. वर्ष २०२२ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचे पुढील अन्वेषणाचे दायित्व ‘सीबीआय’कडे सोपवण्यात आले होते. त्यानंतर सर्वाेच्च न्यायालयानेही ‘सीबीआय’ला अन्वेषण करण्याची संमती दिली होती.
४. ‘सीबीआय’च्या अन्वेषणात हे समोर आले की, के. रघुनाथ यांना आरोपींनी अतिथीगृहामध्ये बलपूर्वक २ दिवस ठेवले होते आणि नंतर त्यांची हत्या करून मृत्यू आत्महत्येप्रमाणे दाखवला गेला होता.
५. सर्व आरोपींची २९ डिसेंबर २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी ‘सीबीआय’ पुढील अन्वेषण करत आहे.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी