पुणे – घरकामासाठी येणार्या एका महिलेला वारंवार स्पर्श करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणार्या आधुनिक वैद्य साजीद शेख याच्या विरोधात कोंढवा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी ३० वर्षीय पीडित महिलेने तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. ही घटना ७ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत घडल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले आहे. तक्रारदार महिला शेख याच्या घरी काम करत होती. त्या काळात आरोपीने कोणत्या ना कोणत्या कारणावरून तिला स्पर्श करणे, जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असे. महिलेने त्यास विरोध केला असता, कामावरून काढून टाकण्याची धमकी देत असे. तक्रारदार एके दिवशी आरोपीच्या घरी दूध आणि पाणी देण्यासाठी गेली होती. ती दरवाजातून वस्तू देत असतांना आरोपीने हात पकडला. मनात अश्लीलता, लज्जा आणि भीती निर्माण होईल, असे कृत्य केले, असेही तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
संपादकीय भूमिका
|

वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वाल्हे येथे उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन !