
नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) – वर्ष २०२४-२५ मध्ये ५ ते २० जुलै २०२४ मध्ये राज्यभर झालेल्या सर्वेक्षणामध्ये शाळाबाह्य बालकांची नोंद जिल्हास्तरीय पोर्टलवर करण्यात आली. त्यात २ सहस्र ४९७ बालके शाळाबाह्य आढळली. १ ते १५ जुलै २०२५ पर्यंत शिक्षक संचालक आणि प्राथमिक शिक्षण संचालक यांच्या माध्यमातून ३ सहस्र २९७ बालके शाळाबाह्य आढळून आली. त्यातील ३ सहस्र १७ बालकांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. २७० बालके शेष आहेत, त्याची कारणे वेगवेगळी आहेत, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेमध्ये दिली.
ठाकरे गटाचे सदस्य सुनील शिंदे यांनी ‘९३’ अन्वये ‘राज्यात १५ सहस्र ३५७ किशोरवयीन मुली शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर राहिल्याविषयी’ची सूचना मांडली होती.
| सर्वेक्षण नक्की खरे कोणते ?
केंद्रशासनाच्या अहवालातून १५ सहस्र ३५७ बालके शाळाबाह्य असल्याचे नमूद केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्वेक्षणातून केवळ ३ सहस्र २८७ बालके शाळा बाह्य आहेत. सद्यःस्थितीत केवळ २७० बालके शाळाबाह्य आहेत, तर प्रश्न असा निर्माण होतो की, खरे सर्वेक्षण कुणाचे ? वर्ष २००५ मध्ये २ दिवसांचे झटपट सर्वेक्षण घेतले होते. त्यात केवळ ग्रामीण भागातील ४ लाख ९७ सहस्र बालके शाळाबाह्य आढळून आली होती. मग हे कसले सर्वेक्षण केले जात आहे ? |
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
पाणी योजना रखडल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संतप्त !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे लोणंद ते तरडगाव प्रस्थान !
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडले