सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव देहली २०२५
सनातन राष्ट्र स्थापनेच्या निर्धारासह ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा अविस्मरणीय समारोप !

भारत मंडपम्, देहली (वार्ता.) – सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात आयोजित होत असलेला ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हिंदूंसाठी अमूल्य आहे. सनातन संस्था ज्या पद्धतीने हिंदूजागृतीचे कार्य करत आहे, ते अत्यंत अनुकरणीय आणि उत्साहवर्धक आहे. सनातन संस्थेच्या साधकांचा त्याग पहाता ही संस्था भावी सशक्त राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात मोठे योगदान देईल, असा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांनी केले. ते ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या दुसर्या दिवशीच्या ‘सनातन राष्ट्र संकल्प संतसभा’ या समारोपाच्या सत्रात बोलत होते. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषासह सनातन राष्ट्राच्या संस्थापनेचा निर्धार करून या महोत्सवाची अविस्मरणीय सांगता झाली.

या सत्रामध्ये छत्तीसगड येथील शदाणी दरबाराचे नववे पीठाधीश्वर प.पू. युधिष्ठिरलालजी महाराज, विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री श्री विज्ञानानंद स्वामीजी, ‘पावन चिंतनधारा आश्रमा’चे संस्थापक पू. पवन सिन्हा, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे हे सहभागी झाले होते. व्यासपिठावर ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’चे संस्थापक अन् माजी सूचना आयुक्त श्री. उदय माहुरकर, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ उपस्थित होत्या.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी