सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव देहली २०२५

सनातन संस्थेने आयोजित केलेला सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा सांस्कृतिक पुनर्जागृतीचा शंखनाद आहे, असे उद्गार केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी येथे बोलतांना काढले. ‘सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित या हिंदु राष्ट्र शंखनाद महोत्सवात सहभागी होणे हा आपल्यासाठी गौरवशाली क्षण आहे. सनातन संस्कृतीच्या प्रवाहाला निरंतर चालू ठेवण्याचा संकल्पासह आयोजित केलेल्या या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सहभागी होणे हा भाग्याचा क्षण आहे’, असेही श्री. शेखावत म्हणाले.
शेखावत म्हणाले की, ‘धर्मेण जयति राष्ट्रम् ।’ म्हणजे धर्म राष्ट्राला विजय प्राप्त करून देतो. धर्माचा मार्गावर चालल्यानेच कुठलेही राष्ट्र विजय प्राप्त करू शकते. दीड महिन्यापूर्वी जेव्हा हा कार्यक्रमाची संकल्पना मांडली जात होती, तेव्हापासून या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याची मी सिद्धता केली होती; परंतु राजकीय क्षेत्रात दायित्व स्वीकारून कार्यरत असल्याने तात्कालिक आणीबाणीच्या आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यामुळे मी येथे उपस्थित राहू शकलो नाही. यासाठी मी खेद व्यक्त करतो.
भगवान श्रीरामाचे मंदिर ५०० वर्षांपूर्वी ज्या आक्रमकांनी तोडले होते, त्याचा ध्वज पाडला होता, तेव्हा भारतीय संस्कृतीचा सूर्यास्त झाला होता. ही ५०० वर्षांची काळरात्र संपून श्रीरामाचे भव्यदिव्य मंदिर होऊन त्यात श्रीरामलल्ला विराजमान झाले. तेव्हापासून भारतीय संस्कृतीचा पुन्हा उदय होत गेला. तेव्हापासून भारताची संस्कृती आणि संस्कृतीची मूल्ये नव्या रूपात विश्वभर पसरली आहे. ‘वंदे मातरम्’ गीताने भारतियांचा हरवलेला आत्मविश्वास जागवला गेला. आज समाजाला संघटित करण्यासाठी ‘वंदे मातरम्’ची आवश्यकता आहे, जेवढी दीडशे वर्षांपूर्वी होती. ‘वंदे मातरम्’ हे केवळ एक गीत नव्हते, तर तो एक मंत्र झाला होता. ‘वंदे मातरम्’ने स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा दिली. ते एकमेकांना भेटण्याचे माध्यम झाले होते. ते सर्वांना एकत्रित करणारे गीत होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांची हत्यारे आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत, आमच्यासाठी ते इतिहासाच्या स्मृती जागृत करणारे माध्यम आहे. जो समाज आपला मूळ इतिहास विसरतो, तो समाज प्रगती करू शकत नाही. आक्रमकांनी २ सहस्र वर्षांत भारतावर अनेक वेळा आक्रमण करून सनातन संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र ते यशस्वी झाले नाही. आपल्या संतांनी सनातन संस्कृतीचे रक्षण केले. त्यांनी लोकांमध्ये ती चेतना जागृत ठेवली. आपण लहानपणापासून आपल्या इतिहासाशी जोडले गेलो आहोत. मातृभूमीसाठी प्राणार्पण करण्याची शिकवण आपल्याला मिळाली. ब्रिटिशांनी हे ओळखून भारतियांचा इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रयत्नरत असणर्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अभिनंदन !सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातनच्या सहस्रावधी साधकांना साधनेच्या मार्गावर एकत्र जोडून संस्कृतीच्या रक्षणासाठी सर्वांना नियोजित पद्धतीने संघटित केल्याविषयी मी त्यांच्या चरणी वंदन करतो. त्यांच्या या सार्थक प्रयत्नाविषयी भारताचा संस्कृतीमंत्री म्हणून मी आभार व्यक्त करतो, त्यांचे अभिनंदन करतो. गेल्या २५ वर्षांत सनातन संस्थेने लोकांना केवळ आध्यात्माच्या उन्नतीच्या मार्गावर नेले नाही, तर समाजाचे नैतिक बळ आणि राष्ट्रबळ वाढवण्यासह धर्मजागृतीचे महान कार्य केले आहे. या महोत्सवाचे आयोजन केवळ ‘शंखनाद’ या शब्दापुरते मर्यादित नाही, तर भारताच्या पुनर्जागृतीचा उद्घोष आहे. भारताच्या हरवलेल्या संस्कृतीचा पुन्हा उदय होत आहे, हे या महोत्सवातून दिसत आहे. |
भारताला शक्तीशाली देश बनवण्याचे सनातन संस्थेचे प्रयत्न अभिनंदनीय !आज भारत सांस्कृतिक उत्क्रांतीच्या मार्गावर आहे. आपला देश परिवर्तनाच्या स्थितीत आहे. सनातन संस्थेने ‘वंदे मातरम्’ची ओळख सर्वांना करून दिल्याविषयी मी त्यांचे आभार मानतो. ‘वंदे मातरम्’ पुन्हा एकदा सर्वांना जोडून त्या माध्यमातून भारताला पुन्हा एका संपन्न आणि शक्तीशाली देश बनवण्याचे सनातन संस्थेचे प्रयत्न अभिनंदनीय आहेत ! |
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची शस्त्रप्रदर्शनाला भेट !

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी १४ डिसेंबर या दिवशी भारत मंडपम् येथील शिवकालीन शस्त्रप्रदर्शनाला भेट दिली. या वेळी त्यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन, त्याचप्रमाणे रुद्राक्ष, शाळीग्राम यांच्या प्रदर्शनालाही भेट दिली. प्रदर्शनाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !
बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान अधिकार्याच्या धार्मिक जाचामुळे हिंदु पोलीस निरीक्षकाची आत्महत्या !
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक
केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court