Sydney Firing : सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील बॉन्डी समुद्रकिनार्‍यावर ज्यूंच्या उत्सवावर जिहादी आतंकवादी आक्रमण : १२ जण ठार

ठार करण्यात आलेला आतंकवादी पाकिस्तानी !

सिडनी (ऑस्ट्रेलिया) – येथील बॉन्डी बीच या समुद्रकिनार्‍यावर ज्यू समाजाच्या हनुक्का उत्सवाच्या वेळी २ जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १२ जण ठार झाले. ही घटना १४ डिसेंबरला घडली. या गोळीबारात अनेक जण घायाळही झाले आहेत. पोलिसांनी आक्रमणकर्त्यांवर केलेल्या गोळीबारात एक आतंकवादी ठार झाला. तो पाकिस्तानचा असून त्याचे नाव अक्रम असल्याचे सांगितले जात आहे. दुसर्‍या आतंकवाद्याला पोलिसांनी अटक केली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी एक निवेदन प्रसारित करत घटनेची चौकशी चालू असल्याचे म्हटले आहे. हे आक्रमणामागे काय हेतू होता, हे अद्याप स्पष्ट झालेली नाही.

संपादकीय भूमिका :

जगभर आतंकवादी आक्रमणे करत असतांना भारताने स्वदेशातील आतंकवादाच्या समुळ उच्चाटनासाठी पावले उचलावीत !