मंत्री उपस्थित नसल्यामुळे सुधीर मुनगंटीवार प्रचंड संतापले !

नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – गेल्या २ दिवसांपासून विधानसभेत मंत्री आाणि संबंधित विभागांचे सचिव उपस्थित नसल्याच्या कारणावरून उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी अप्रसन्नता व्यक्त केली होती. १२ डिसेंबर या दिवशी भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनाही मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून आणि घरकुल योजनेच्या रखडलेल्या निधीवरून सरकारला धारेवर धरले. ‘सभागृहात मंत्री येत नसतील, तर त्यांच्यावर बिबटे सोडा’, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने त्यांनी आक्रमकपणे तालिका अध्यक्षांना सुनावले की, मंत्रीमहोदयांना सभागृहात आणण्याचे दायित्व तुमचे आहे. आमदार उपस्थित असतांना मंत्री अनुपस्थित रहातात, हे चालणार नाही.
चंद्रपूर जिल्ह्यातील ‘यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने’च्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुलाचे लाभ देण्यावरून रखडलेल्या निधीवरून ते म्हणाले. ‘‘भारतमाता माझी आई; पण डोकं ठेवायला जागा नाही’, अशी गरिबांची अवस्था आहे. मुंबईत असलेल्यांसाठी सरकारकडे ११ लाख कोटी रुपये आहेत; पण चंद्रपूरमधील तुटक्या-फुटक्या घरात रहाणार्या गरिबांसाठी लागणारे ९६ कोटी ३६ लाख रुपये मिळत नाहीत. ज्या अधिकार्यांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे, त्यांनी कोरड्या विहिरीत जीव दिला पाहिजे’’, अशा तिखट शब्दांत त्यांनी प्रशासनाचे वाभाडे काढले.
सरकारच्या कारभारावर टीका करतांना मुनगंटीवार म्हणाले की, या योजनेच्या दुसर्या हप्त्यासाठी गरिबांना चातक पक्ष्याहून अधिक वाट पहावी लागते. कापूसकोंड्याची गोष्ट संपेल, बिरबलाची खिचडी शिजेल, चिऊताई दरवाजा उघडेल; पण तुमचा निधी काही येत नाही. अधिकार्यांनी लिहून दिलेली उत्तरे वाचू नका, तर निधी कधी देणार ते स्पष्ट सांगा.
यानंतर ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी ‘निधी लवकरात लवकर दिला जाईल’, असे आश्वासन दिले. ते म्हणाले की, पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेसाठी ३०० कोटी रुपये संमत झाले आहेत. चंद्रपूरला विहीत १०० टक्के निधी त्वरित दिला जाईल. आपण नवीन घरकुल ‘पंतप्रधान आवास योजने’च्या माध्यमातून देत आहोत; पण आधीच्या घरकुल योजनेसाठी आपण ३०० कोटी रुपयांची व्यवस्था केली आहे. त्यावर त्वरित कार्यवाही होईल.
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
कोलकात्याच्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयामधील तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात सापडली मोठी रक्कम