भारताची हिंदु संस्कृती, संस्कार आणि आपले समर्पण, सुख, समृद्धी, विचार येथे पहातो. संपूर्ण जगात विभिन्न देशात रहाणारे लोक ते आपला देश, म्हणजे एखाद्या भूमीचा तुकडा मानतात; परंतु आपण या भारतात जन्म घेतला आहे. केवळ हा भूमीचा तुकडा नसून जीवन जगण्यासाठी साध्य आणि साधनही आहे. आपण भाग्यवान आहोत की, भारतात आपला जन्म झाला आहे. भारत देश हा भूमीचा तुकडा नसून तो एक जिवंत आत्मा आहे. ज्याला आपण सनातनच्या रूपात पहातो. त्याचा ना एक प्रारंभ आहे, ना अंत !

१. हिंदूंनी वाणीसह धाडस आणि शौर्य यांचे प्रदर्शन करायला हवे !
‘एका हातात माला आणि दुसर्या हातात भाला’, या गोष्टीचा आपल्याला विचार करायला हवा. आपल्याला असे सांगितले गेले किंवा आपल्या मनात असा भीडस्तपणा आहे की, स्वतःचे संरक्षण करायचे असेल, तर आपण बोलण्याचा प्रयोग करायचा आहे, जो विनम्र आणि समर्पित असेल. केवळ वाणी नव्हे, तर स्वतःचे धाडस आणि शौर्य यांचे प्रदर्शनही करायला हवे.
२. हिंदूंनी जागृत होऊन आणि एकत्र येऊन कार्य करायला हवे !

भारत हा संत आणि महात्मा यांचा देश आहे. जिथे पिंड असेल, तिथे ब्रह्मांड असेल. भारतीय संस्कृती ही जगातील एक मोठी संस्कृती आहे. जी शक्ती आदिकाळापर्यंत रहाणार आहे, त्या शक्तीच्या अंतर्गत या देशात आपण रहात आहोत. आपण विश्व कल्याणाची चर्चा करतो. सनातन संस्कृतीत आपण सर्वजण सकाळी देवतांची पूजा करतो. त्या वेळी म्हणतो, ‘धर्माचा विजय असो, अधर्माचा नाश होवो, प्राण्यांमध्ये सद्भावना हो, विश्वाचे कल्याण हो.’ हीच सनातन संस्कृतीची सुंदरता आहे. सर्वत्र करण्यात येत असलेली पूजा, विविध संप्रदायाची साधना ही शेवटी एकाच गुरुतत्त्वात विलीन होत असते. कुराणात ‘जे मुसलमान नाहीत, त्यांना काफीर समजून ठार मारा’, असे सांगितले आहे. मला हे मान्य नाही. हे चालणार नाही. धर्म विचारून लोकांना ठार मारले जाते. यासाठी हिंदूंनी जागृत व्हायला हवे. आपण कुठेही असलो, तरी आपल्याला एकत्र येऊन कार्य करायचे आहे. या कार्यात आपण जेवढा सहभाग घेऊ शकतो, तेवढा सहभाग घेऊन कार्य केले पाहिजे. समाजात परिवर्तन सरकारकडून नाही, तर समाजातून होत असते. समाजात परिवर्तन करायचे कार्य संतांकडून केले जाते. संतांच्या वतीने हा संदेश दिला जातो. या कारणास्तव हिंदु संस्कृती टिकून आहे. आपल्याकडे जेवढी क्षमता आहे तेवढ्या क्षमतेनुसार आपण कार्य केले पाहिजे.
३. मूळ राज्यघटनेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष सांगितलेला नाही !
मूळ राज्यघटनेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष सांगितलेला नाही. मूळ राज्यघटनेत राष्ट्र आणि संस्कृती यांचे वर्णन करण्यात आले होते. यासाठी वास्तविकता काय आहे, याचा विचार आपण करायला हवा. राज्यघटनेला राजकारण जोडून स्वतःचा उद्देश साध्य करण्याचा काही जण प्रयत्न करतात. समाज जागृत झाल्यानंतर समाजातील परिवर्तनाच्या गोष्टीविषयी आपण बाेलू शकतो. श्रीरामजन्मभूमीसाठी ५०० वर्षे संघर्ष करावा लागला. भगवान श्रीराम आणि त्याचे मंदिर ही आमची श्रद्धा आहे.
४. सनातनचा आदर्श स्वतःच्या जीवनात उतरवणे आवश्यक आहे !
या महोत्सवातून जो शंखनाद होईल, मोठा ध्वनी निर्माण होईल, येथून संतांच्या आशीर्वादाने जो प्रकाश निर्माण होईल, तो प्रकाश संपूर्ण देशात रामराज्य आणेल. गेल्या २५ वर्षांपासून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातन संस्थेचे कार्य वाढवल्याविषयी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रणाम करतो. सनातनचा आदर्श आपल्या जीवनात उतरवणे आवश्यक आहे. देशाची प्रगती, हिंदु राष्ट्राची स्थापना आणि धर्मविरांचा सन्मान यांसाठी आपल्याला पुढे जावे लागेल. संतांनी दिलेले आशीर्वाद आणि केलेले मार्गदर्शन यांमुळे आम्ही सत्तेवर आहोत. संत आम्हाला नवीन दिशा देण्याचे कार्य करत आहेत.
– श्री. सतीश महाना, अध्यक्ष, विधानसभा, उत्तरप्रदेश.
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?