सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव देहली २०२५
‘स्वराज्य आणि संस्कृती’ या विषयावर उद्बोधन सत्र

भारत मंडपम् : सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवातील पहिल्या उद्घाटन सत्रानंतर ‘स्वराज्य आणि संस्कृती’ या विषयावर उद्बोधन सत्राला प्रारंभ झाला. या सत्रामध्ये व्यासपिठावर संरक्षण खात्याचे संयुक्त सचिव डॉ. वेदवीर आर्य, भाजपचे प्रवक्ते श्री. प्रदीप भंडारी, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ.चारुदत्त पिंगळे आणि सनातनचे संत पू. प्रदीप खेमका हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आरंभी पू. प्रदीप खेमका यांनी या महोत्सवानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन केले. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी संरक्षण खात्याचे संयुक्त सचिव डॉ. वेदवीर आर्य यांचा सत्कार केला. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी भाजपचे प्रवक्ते श्री. प्रदीप भंडारी यांचा सत्कार केला. यानंतर डॉ. वेदवीर आर्य यांनी लिहिलेल्या ‘क्रोनोलॉजी अँड ओरिजिन्स ऑफ इंडो-युरोपियन सिव्हिलायजेशन’ (इंडो-युरोपियन संस्कृतीचा कालक्रम आणि उगम) या पुस्तकाचे व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

डॉ. वेदवीर आर्य हे प्राचीन भारतीय इतिहास आणि वैदिक ज्ञानाचे विशेषज्ञ आहेत. त्यांनी भारताच्या अस्मितेशी जोडलेली अनेक महत्त्वपूर्ण तथ्ये आणि दस्तऐवज यांच्या आधारावर भारतीय इतिहासातील विकृत कथानकांचे या पुस्तकातून खंडन केले आहे.
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !