-
वर्ष २०१८ चे कोरेगाव भीमा येथील दंगल प्रकरण
-
चौकशी आयोगाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली

पुणे – कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर माजी मुख्यमंत्री, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांचे म्हणणे ७ जानेवारी २०२६ या दिवशी अधिवक्त्याकडून मांडणार आहेत. ‘वंचित बहुजन आघाडी’चे संस्थापक अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी प्रविष्ट (दाखल) केलेल्या अर्जासंदर्भात उद्धव ठाकरे यांना चौकशी आयोगाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी २४ जानेवारी २०२० या दिवशी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र दिले होते. त्या पत्रात असे नमूद केले होते की, १ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचाराचा कट भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने रचला होता. ही माहिती देणारा अर्ज अधिवक्ता आंबेडकर यांनी फेब्रुवारीमध्ये आयोगाला केला होता. त्या संदर्भातील वार्तेचे (बातमीचे) कात्रणही जोडण्यात आले होते. ते पत्र उद्धव ठाकरे यांनी आयोगासमोर सादर करावे, अशी विनंती त्यांनी आयोगाला केली होती.
चौकशी आयोगाने ठाकरे यांना २ वेळा नोटीस बजावून कागदपत्रे वैयक्तिक स्वरूपात किंवा त्यांच्या अधिवक्त्याकडून सादर करण्याचे सांगितले होते. त्याला ठाकरे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आंबेडकरांचे अधिवक्ता किरण कदम यांनी ठाकरे यांच्याविरोधात ‘जामीनपात्र अटकपत्र’ जारी करण्याची मागणी आयोगाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने ठाकरे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली आहे.
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
नवी मुंबईत महापालिकांच्या शाळेत आता इंग्रजी माध्यमातून बालवाडीचे वर्ग चालू होणार !
शेतकर्यांच्या कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही आता ऑनलाईन होणार !
मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मिडिया हब’ उभारणार !
आंबिवली (कल्याण) येथील इराणी लोकांकडून बसवर दगडफेक; प्रवासी घायाळ