|

देहली – सनातन धर्माचे तत्त्वज्ञान आणि राष्ट्रनिर्माणातील त्याचे योगदान यावर आधारित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ लवकरच देहली येथे आयोजित होत असतांनाच, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कारप्राप्त युवा चित्रपट निर्माते ओम भारद्वाज यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याची विशेष विनंती केली आहे. भारद्वाज यांच्या आगामी माहितीपटाचे नाव ‘हिंदु राष्ट्र आणि भारतातील युवा’, असे असून महोत्सवासारख्या मोठ्या कार्यक्रमात उपस्थित राहून त्याचे चित्रीकरण करू देण्याची त्यांनी आयोजकांकडे विनंती केली आहे. भारद्वाज यांच्या या विशेष मागणीतून महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. हा महोत्सव राष्ट्र-धर्माच्या विचारांना कलात्मक आणि प्रभावी माध्यमांतून युवा पिढीपर्यंत पोचवण्यास एक नवी दिशा देईल.
नवी देहलीचे रहिवासी असलेले भारद्वाज यांचा लघुपट नुकताच दैनिक ‘भास्कर’च्या ‘जे.एफ्.एफ्. फिल्म फेस्टिव्हल’मध्ये उपविजेता ठरला आहे. पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांनी ‘सनातन धर्माचे खरे स्वरूप, जतन आणि प्रचार’ करण्याचे ध्येय स्वीकारले. आता ‘हिंदु राष्ट्र आणि भारतातील युवा’ या विषयावर एक माहितीपट (डॉक्युमेंटरी) बनवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारद्वाज यांनी हाती घेतला आहे.
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव माझ्या माहितीपटाच्या निर्मितीसाठी निर्णायक ठरील ! – ओम भारद्वाज
भारद्वाज यांनी म्हटले की, या राष्ट्राचा एक तरुण म्हणून आपल्या धार्मिक परंपरांना प्रामाणिकपणे आणि आदराने समजून घेणे, अनुभवणे अन् त्यांचे प्रतिनिधित्व करणे, हे माझे नैतिक दायित्व आहे. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा केवळ एक उत्सव नसून तो सनातन परंपरेच्या मूळ मूल्यांचा ‘शंखनाद’ करणारे व्यासपीठ आहे. हा महोत्सव माझ्या माहितीपटाच्या निर्मितीसाठी निर्णायक ठरील आणि मी तुम्हाला वचन देतो की, माझ्या कामातून तुमच्या प्रयत्नांचा योग्य मान अन् आदर राखला जाईल. |

Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’