कॉ. पानसरे हत्या प्रकरण

कोल्हापूर, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – काळा पैसा म्हणजे काय ?, ते मला माहिती नाही. कॉ. पानसरे यांनी कधीही काळ्या पैशांच्या विरोधात आंदोलन केले नाही. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संदर्भात ‘ईडी’ने (अंमलबजावणी संचालनालयाने) त्यांच्या कार्यालयावर धाडी घातल्या होत्या; त्या संदर्भातही आम्ही कधी आंदोलन केले नाही, अशी साक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांनी एकेकाळी काम केले, त्या शशिकांत पाटील यांनी दिली. कोल्हापूर येथील जिल्हा न्यायालयात अधिवक्ता नागेश जोशी यांनी शशिकांत पाटील यांची कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणात उलटतपासणी घेतली. त्या प्रसंगी त्यांनी ही उत्तरे दिली. कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे.
याप्रसंगी बचाव पक्षाच्या वतीने अधिवक्ता समीर पटवर्धन, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्ता संग्राम कोल्हटकर, अधिवक्ता सतेंद्र मुळे, अधिवक्त्या प्रीती पाटील, तर सरकारी पक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे उपस्थित होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ डिसेंबर या दिवशी होणार आहे.
कॉ. गोविंद पानसरे यांनी प्राणी क्रूरतेच्या विरोधात कधी आंदोलन केले नाही !
अधिवक्ता सतेंद्र मुळे यांनी घेतलेल्या उलटतपासणीत शशिकांत पाटील यांनी ‘कॉ. गोविंद पानसरे यांनी प्राणी क्रूरतेच्या विरोधात कधी आंदोलन केले नाही आणि मुसलमान धर्मात अंधश्रद्धा नाहीत’, अशी उत्तरे दिली. ‘हिंदु धर्मातील चुकीच्या प्रथांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ज्याप्रकारे आंदोलन केले, त्या प्रकारे इतर धर्माच्या चुकीच्या प्रथांच्या विरोधात तसे आंदोलन केले होते का ?’, असा प्रश्न विचारल्यावर शशिकांत पाटील यांना कोणतेही समाधानकारक उत्तर देता आले नाही.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा