प्रलंबित प्रश्नांसाठी २५ नोव्हेंबर या दिवशी कुलगुरुंसमवेत चर्चा होणार !

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी ‘स्पुक्टो’ने (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठीय आणि महाविद्यालयीन अध्यापक संघटना) बेमुदत धरणे आंदोलन चालू करून ६ दिवस झाले आहेत. विद्यापीठ प्रशासनासमवेत संघटनेच्या पदाधिकार्यांची बैठक झाली; परंतु त्यात कोणताही ठोस निर्णय झाला नाही. परिणामी ‘स्पुक्टो’ संघटनेने उपोषण चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
विद्यापिठांमध्ये अनेक विभागांमध्ये विद्यापीठ निधीतून नियमित वेतनश्रेणीवर प्राध्यापकांच्या नेमणुका ५ वर्षांसाठी केल्या होत्या. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर २० वर्षे अथवा सेवानिवृत्तीपर्यंत सेवा सातत्य देण्याविषयी विद्यापिठाच्या व्यवस्थापन परिषदेने निर्णय घेतला आहे; परंतु त्याची कार्यवाही करण्यास विद्यापीठ प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. नियुक्तीपासून प्राध्यापकांना लागू असलेल्या अंशदायी भविष्य निर्वाह निधीच्या संदर्भात तुटपुंजी रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयालाही संघटनेने विरोध केला आहे. विद्यापीठ प्रशासनाने २५ नोव्हेंबर या दिवशी कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्यासमवेत चर्चा करण्यासाठी संघटनेच्या प्रतिनिधींना बोलावले आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !