लोकप्रतिनिधींच्या मनमानीपणामुळे आर्थिक हानी !

पुणे – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात बाणेर येथील ‘नोबल एक्स्चेंज इन्व्हायरो बायो सी.एन्.जी.’ प्रकल्प काही काळाकरता बंद ठेवण्याचा आदेश पुण्यातील लोकप्रतिनिधींनी दिला होता. या बंद काळात ठेकेदाराची झालेली आर्थिक हानी भरून देण्यासाठी महापालिकेला २ कोटी ८१ लाख रुपये द्यावे लागले. ही रक्कम देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. केवळ लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून महापालिकेला हा आर्थिक बोजा सहन करावा लागला असल्याचे चित्र दिसून येते. (हानीची रक्कम ज्या लोकप्रतिनिधींनी आदेश दिला त्यांच्याकडून वसूल करावी, असेच नागरिकांना वाटते – संपादक)
ओल्या कचर्यांपासून ‘बायो सी.एन्.जी.’ निर्मितीचा प्रकल्प बाणेर भागातील सूस रस्त्यावर उभारण्याच्या प्रस्तावास महापालिकेने वर्ष २०१५ मध्ये मान्यता दिली होती. त्याची समयमर्यादा ही ३० वर्षे अशी होती. ओल्या कचर्यावर प्रक्रिया केली जात असल्याने परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास होऊ लागला. या प्रकल्पाच्या विरोधात ‘सूस रोड बाणेर विकास संघा’ने या विरोधात ‘राष्ट्रीय हरित लवादा’मध्ये याचिका प्रविष्ट केली. लवादाने महापालिकेच्या विरोधात निर्णय देत ४ महिन्यांत हा प्रकल्प स्थलांतरित करावा, असे आदेश दिले. महापालिकेने या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर तेथे महापालिकेच्या बाजूने निकाल लागला. यानंतर प्रकल्पबाधित रहिवाशांनी तत्कालीन पालकमंत्री आणि अन्य लोकप्रतिनिधी यांकडे तक्रार केली. तेव्हा ‘निवडणुका जवळ असल्याने हा प्रकल्प बंद ठेवावा’, असे आदेश लोकप्रतिनिधींनी दिले.
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू