आपत्कालीन वॉर्डमध्ये आमदार आल्यानंतर उभे न रहणार्या डॉक्टरवर कारवाई केल्याचे प्रकरण
चंडीगड – कोरोना महामारीच्या काळात रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये आमदार आल्यानंतर एक डॉक्टर उभे राहिले नाहीत; म्हणून हरियाणा सरकारने त्या डॉक्टरला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. या घटनेवर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हरियाणा राज्य सरकारला ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच सरकारला त्या डॉक्टरचे अडवून ठेवण्यात आलेले ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ तातडीने देण्याचे निर्देशही दिले आहेत. हे प्रमाणपत्र रोखून धरल्यामुळे डॉक्टरला पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेता येत नव्हते.
Punjab & Haryana HC comes down hard on Haryana Govt 👏
A ₹50,000 fine imposed for issuing a baseless show-cause notice to a doctor – whose only “fault” was not standing up when an MLA walked into a COVID emergency ward.
The Court called the govt’s action “insensitive” and… pic.twitter.com/wYgJMN2Bdv
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 23, 2025
उच्च न्यायालयाने आदेश देतांना म्हटले की, आमदार रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये आल्यानंतर डॉक्टराने उभे रहावे, अशी अपेक्षा करणे आणि डॉक्टर उभे राहिले नाहीत म्हणून त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करणे, हे अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. त्या डॉक्टरांनी आमदारांना ओळखले नाही आणि त्यांनी आमदारांचा अपमान होईल, असे काहीही केले नाही, या याचिकाकर्त्याच्या स्पष्टीकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. राज्याकडून याचिकाकर्त्याच्या विरोधात अशा आरोपांवरून कारवाई करणे असंवेदनशील आहे. केवळ त्यांच्याविरुद्धची ‘कारणे दाखवा’ नोटीस प्रलंबित आहे; म्हणून ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ रोखून त्यांना उच्च वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवणे, हेही तितकेच मनमानी आहे.
संपादकीय भूमिकासंबंधितांना केवळ दंड ठोठावून सोडू नये, तर त्यांना कठोर शिक्षाही करणे आवश्यक आहे, तरच धाक निर्माण होईल ! |

कुंभपर्वासाठी ३४ सहस्र ७३२ कोटी रुपयांचे प्रावधान – उदय सामंत, उद्योगमंत्री
जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील ढिसाळ कारभार आणि नागरिकांची फरफट !
मुसलमान युवती आणि तिचा सहकारी यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !
रंगपूर (बांगलादेश) येथील एका हिंदु दुकानदारावर जीवघेणे आक्रमण !
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
आळंदी (जिल्हा पुणे) बसस्थानकातील फलाटांच्या नावाच्या पाट्या गायब