|

नवी देहली – देहली बाँबस्फोटाच्या प्रकरणी हरियाणाच्या फरीदाबाद येथील अल्-फलाह विद्यापिठाचे अध्यक्ष अहमद सिद्दीकी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक करून न्यायालयात उपस्थित केल्यावर त्यांना १३ दिवसांची कोठडी सुनावली. या वेळी ईडीने न्यायालयाला सांगितले की, सिद्दीकीने अल्-फलाह विद्यापिठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मान्यताप्राप्त संस्था असल्याचा दावा करून दिशाभूल केली आणि ४१५ कोटी १० लाख रुपयांचे बेकायदेशीर उत्पन्न जमा केले. जर त्यांना अटक झाली नसती, तर ते परदेशात पळून जाऊ शकले असते आणि तपास टाळून पुरावे नष्ट करू शकले असते.
🔥 “Al-Falah Scam EXPOSED!” 🔥
🚨 Delhi Bomb Blast Update
ED has arrested Al-Falah University President Ahmed Siddiqui, who illegally earned ₹415 crore and was caught just before fleeing abroad!
📌 ED says Siddiqui duped students and parents by falsely claiming the university… https://t.co/hwEW3ZOWve pic.twitter.com/HVtYZN8CSn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 20, 2025
ईडीने न्यायालयाला सांगितले की, वर्ष १९९० नंतर अल्-फलाह समूह वेगाने वाढला आणि एक प्रमुख शैक्षणिक संस्था बनला. तथापि, समुहाची आर्थिक स्थिती आणि त्याच्या मालमत्तेत लक्षणीय भेद आहे, ज्यामुळे संशय निर्माण होतो.
अल्-फलाहाच्या २०० जणांवर लक्ष
गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अल् फलाह विद्यापिठात काम करणारे किंवा शिक्षण घेणारे १० लोक बेपत्ता आहेत. त्यांच्याशी संपर्क साधता येत नाही. त्यांपैकी ३ काश्मिरी आहेत. त्यांचे भ्रमणभाष संच बंद आहेत. जम्मू-काश्मीर आणि हरियाणा पोलिसांचे संयुक्त पथक त्यांना शोधण्यासाठी काम करत आहेत. याखेरीज या विद्यापिठातील एकूण २०० जणांवर अन्वेषण यंत्रणांकडून लक्ष ठेवले जात आहे.
संपादकीय भूमिकाही सर्व संपत्ती जप्त करून हे विद्यापीठ आता पाडून टाकणेच योग्य आहे ! तसेच देशातील अशा सर्व इस्लामी विद्यापिठांची याच दृष्टीने युद्धपातळीवर चौकशी चालू केली पाहिजे ! |
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !