
पुणे – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून ज्या अविवेकाने केला, त्या समाजात विवेकवादी विचार रुजवणे हे मोठे आव्हान आहे. सध्या ज्ञानविरोधी लोक ‘मोकाट’ आहेत, ज्ञानमार्गी लोक ‘मुकाट’ आहेत. कुतूहल जागृत करणे आणि प्रश्न विचारायला लावणे, हे विद्यापिठाचे मूलभूत कार्य आहे; परंतु सामाजिक सत्ता आणि व्यवहार यांमुळे विद्यापिठे ज्ञान निर्मितीपासून दूर जात आहेत, असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे प्रा. सुहास पळशीकर यांनी केले. ते ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापिठा’च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या वेळी दाभोलकरांच्या १० इंग्रजी भाषांतरीत पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले.
डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, ‘‘दाभोलकरांची ‘सत्यशोधक विद्यापीठ चालू करण्याची इच्छा होती. ही कल्पना ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ (अंनिस) आता डिजीटल स्वरूपात प्रत्यक्षात आणत आहे.’’
या लोकविद्यापिठामध्ये प्रारंभी वैज्ञानिक दृष्टीकोन, अंगात येणे, भुताने झपाटणे, भ्रामक वास्तूशास्त्र, छद्म विज्ञान आणि व्यसनमुक्ती या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळणार आहे. (म्हणजे विद्यापीठ स्थापून पुन्हा वास्तूशास्त्र, हिंदूच्या प्राचीन विज्ञानाला छद्म विज्ञान म्हणून हिणवणे हा प्रकार चालूच रहाणार असल्याने प्रशासनाने हे विद्यापीठच तात्काळ बंद करून लहान मुलांच्या मनावर होणारा वाईट परिणाम टाळावा, ही जागरूक नागरिकांची अपेक्षा ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
पुण्यात श्री निवडुंगा विठोबा देवस्थान येथे पालखी सोहळ्याची जय्यत सिद्धता !
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !