चंद्रपूर आकाशवाणीवरही कार्यक्रम !

चंद्रपूर, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘आदर्श आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी कशी करावी ?’, याविषयी सनातन संस्थेच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १५ ठिकाणी प्रवचने घेण्यात आली, तसेच भित्तीपत्रकाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. चिखली (तालुका मुल, जिल्हा चंद्रपूर) येथील श्री. चंद्रचुड येनुरकर विद्यालयामध्ये प्रवचन घेण्यात आले. त्याचा लाभ विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी घेतला. यासमवेतच चंद्रपूर आकाशवाणी केंद्रावरून दिवाळी साजरी करण्यामागील शास्त्र विषद करणारी माहिती प्रसारित करण्यात आली. त्याचा अनुमाने ३ सहस्र लोकांनी लाभ घेतला. गडचिरोली येथेही प्रवचनाच्या माध्यमातून जिज्ञासूंना मार्गदर्शन करण्यात आले.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !