Sanatan Ekta Padayatra : ‘सनातन एकता पदयात्रे’च्या वेळी मथुरा येथे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची प्रकृती बिघडली !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची ‘सनातन एकता पदयात्रा

मथुरा : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची ‘सनातन एकता पदयात्रे’च्या ८ व्या दिवशी, म्हणजे १५ नोव्हेंबरला प्रकृती पुन्हा बिघडली. सलग तिसर्‍या दिवशी त्यांची प्रकृती खालावली. ताप, अल्प रक्तदाब आणि श्वास घेण्यास त्यांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांना यात्रेतच आराम करावा लागला. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या फुफ्फुसात पुष्कळ धूळ साचल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता; मात्र त्यांनी मुखपट्टी (मास्क) घालण्यास नाकार दिला.

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची ‘सनातन एकता पदयात्रेत प्रकृती खालावली

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची प्रकृती पदयात्रेच्या पहिल्या दिवसापासूनच खराब होती; पण कुणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत; म्हणून त्यांनी यात्रा चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. ‘त्यांना सध्या १०० अंश ‘फॅरेनहाइट’ ताप असून आणि त्यांचा रक्तदाबही लक्षणीयरित्या न्यून झाला आहे. अनवाणी चालण्यामुळे त्यांची प्रकृती आणखी बिकट झाली आहे’, असे पदयात्रेत त्यांच्या समवेत आलेले उत्तरप्रदेशचे नेते राजा भैया यांनी सांगितले.

जे रामासमवेत नाहीत, ते निरुपयोगी ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

भारतीय शेतकर्‍यांना समर्पित या पदयात्रेत मथुरेतील कोसीकला येथे धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले की, ज्यांना ‘रामनाम’, ‘वन्दे मातरम्’ किंवा ‘जय श्रीराम’ यांविषयी अडचण आहे, त्यांनी लाहोरला जाण्यासाठी तिकिटांचे आरक्षण करावे. जे रामासमवेत नाहीत, ते निरुपयोगी आहेत. ‘मी मुसलमानांच्या विरोधात नाही, तर देशाचे शत्रू असलेल्यांच्या विरोधात आहे. या वेळी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी मुसलमानांना त्यांचे शिक्षण धोरण पालटण्याचे आवाहन केले.