देहली येथील बाँबस्फोटाचे प्रकरण

म्हापसा, १३ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील बागा आणि हडफडे येथील २ वेगवेगळ्या दुकानांबाहेर लावलेल्या ‘एल्.ई.डी.’ (आधुनिक विद्युत्दिवे) फलकांवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’, अशी घोषणा काही दिवसांपूर्वी झळकली होती. देहली येथे १० नोव्हेंबर या दिवशी बाँबस्फोट झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर बागा आणि हडफडे येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’ फलक झळकणे या घटनेकडे ‘लहानसा प्रकार’ असे न पहाता गांभीर्याने पहावे, असे आवाहन हडफडे-नागोवा पंचायतीचे सरपंच रोशन रेडकर यांनी त्यांच्या ‘फेसबुक’ खात्यावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सामाजिक माध्यमातून केला आहे.
सरपंच रोशन रेडकर यांनी म्हटले आहे, ‘‘पाकिस्तान झिंदाबाद’ फलक झळकल्याच्या प्रकरणी त्वरित कारवाई होण्याची आवश्यकता होती. विशेष म्हणजे संबंधित ‘एल्.ई.डी.’ फलकांना इंटरनेट जोडणी नव्हती आणि ते फलक मर्यादित परिघामध्ये कार्यरत होते, तरीही काही जण ते ‘हॅक’ केल्याचा दावा करत होते. त्यांना ही घटना एक लहानशी घटना वाटत असेल; परंतु ही घटना गंभीर असून यामुळे सार्वजनिक सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. देहलीसारख्या घटना गोव्यात होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे अत्यावश्यक आहे.’’
संपादकीय भूमिका :
|
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा