
मुंबई – वडाळा येथे चाचणी घेत असलेल्या एका मोनोरेलच्या डब्याचा अपघात झाला. मोनोरेलचा एक डबा रूळावरून खाली उतरून एका बाजूला झुकला आणि बाजूच्या खांबावर आदळळा. सुदैवाने यात प्रवासी नव्हते. त्यामुळे अनर्थ टळला. ही घटना सकाळी ९ वाजता घडली. मोनोरेल रूळ पालटत असतांना हा प्रकार झाला. काही तांत्रिक बिघाडामुळे रुळावरून डबा खाली घसरला. तो बाजूला झुकून ट्रॅकच्या बाजूला असलेल्या खांबावर आदळला.
या वेळी घटनास्थळी आलेल्या मोनोच्या अधिकार्यांशी पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला; पण मोनोरेलच्या अधिकार्याने पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळले.
संपादकीय भूमिकामुंबईत मोनोरेलचे अपघात आता नवीन राहिलेले नाहीत. वाढत्या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन काय करणार आहे ? |
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन