‘२२ सप्टेंबर २०२५ पासून नवरात्र चालू झाली. आमच्या घरी नवरात्रीचे घट बसतात. २६ सप्टेंबर या दिवशी ललिता पंचमी होती. या दिवशी रात्री देवीची आरती करत असतांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदामाते (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ) साक्षात् समोर सिंहासनावर विराजमान आहेत आणि मी त्यांच्या चरणांची आरती करत आहे’, असे मला जाणवले. आरती करतांना माझा भाव पुष्कळ जागृत झाला होता. त्या वेळी देवाने पुढील ओळी सुचवल्या. त्या गुरुमाऊलीच्या चरणी अर्पण करते.

जन्म घेतला आपण भाद्रपद अमावास्येच्या दिनी ।
उद्धार करण्या आम्हा पामरांचा येऊन संस्थेतूनी ।
माते (टीप १), त्रिवार नमस्कार आमचा आपुल्या चरणी ।। १ ।।
साधकांना आनंद देती प्रीतीचा वर्षाव करूनी ।
घेतले व्रत हाती साधक घडवण्याचे, गुरुदेवांची उत्तराधिकारी होऊनी ।
माते, त्रिवार नमस्कार आमचा आपुल्या चरणी ।। २ ।।

स्वभावदोष अन् अहं यांमुळे वंचित रहाती साधक गुरुचरणांपासूनी ।
घडवण्या साधका कठोरपणे जाणीव करून देऊनी ।
माते, त्रिवार नमस्कार आमचा आपुल्या चरणी ।। ३ ।।
नवरात्र सण असे एकदा वर्षातूनी ।
पण साधक अनुभवती देवीतत्त्व भक्तीसत्संगातूनी ।
माते, त्रिवार नमस्कार आमचा आपुल्या चरणी ।। ४ ।।
चुकलो जरी आम्ही तरी मायेने समजावूनी ।
साधका घडवण्या अहोरात्र झटती अपार कष्ट घेऊनी ।
माते, त्रिवार नमस्कार आमचा आपुल्या चरणी ।। ५ ।।
गुरुमाऊली (टीप २), अपार कृपा करून आम्हा सर्व साधकांवरती ।
साधनावृद्धी करण्यास आम्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदामाते देऊनी ।
किती कृतज्ञता व्यक्त करू तव चरणाप्रती ।। ६ ।।
टीप १ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
टीप २ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
– अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. (२७.९.२०२५)
|
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !