कर्नाटक काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा केंद्र सरकारवर आरोप

बेंगळुरू (कर्नाटक) – केंद्र सरकारकडून राज्यावर हिंदी लादण्याचे सतत प्रयत्न होत आहेत. हिंदी आणि संस्कृत यांच्या विकासासाठी अनुदान दिले जाते, तर देशातील इतर भाषांकडे दुर्लक्ष केले जात आहे. इंग्रजी आणि हिंदी भाषा आपल्या मुलांची प्रतिभा दुर्बल करत आहेत. मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम बनवणारा कायदा असावा.
केंद्र सरकारने मातृभाषेतून शिक्षण सक्तीचे करावे, अशी मागणी कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्र सरकारवर कन्नड भाषेकडे दुर्लक्ष करून हिंदी लादल्याचा आरोप करतांना केली. त्यांनी राज्यातील जनतेला कन्नड भाषेला विरोध करणार्यांना विरोध करण्याचे आवाहनही केले. ते कर्नाटकच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ७० व्या राज्योत्सवात बोलत होते. ‘केंद्र सरकार कर्नाटकशी सावत्र आईसारखे वागत आहे’, असेही ते म्हणाले.
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक
महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्र उभारणार !
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री