‘भगव्या आतंकवादा’चा खोटा प्रचार – मग सत्य काय ?, या विशेष कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर, १३ ऑक्टोबर (वार्ता.) – वर्ष २००८ मध्ये मालेगाव येथे घडलेल्या बाँबस्फोट प्रकरणात निर्दाेष ठरलेले धर्मवीर आणि त्यांना साहाय्य करणारे अधिवक्ते यांचा सत्कार १३ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देवल क्लब येथे करण्यात आला. हा सत्कार ‘भगव्या आतंकवादा’चा खोटा प्रचार – मग सत्य काय ?’ या विशेष कार्यक्रमात करण्यात आला. यात प्रामुख्याने धर्मवीर समीर कुळकर्णी आणि मेजर रमेश उपाध्याय यांचा सत्कार, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्ता समीर पटवर्धन, अधिवक्त्या प्रीती पाटील यांच्यासह हिंदुत्वनिष्ठ लेखक श्री. विक्रम भावे यांचाही सत्कार करण्यात आला.
मालेगाव प्रकरणी निर्दोष मुक्तता झालेल्या साध्वी प्रज्ञासिंह, श्री. राकेश धावडे, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, श्री. सुधाकर चतुर्वेदी, श्री. शाम साहू आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांसारखे धर्मवीर या सोहळ्याला उपस्थित नव्हते; पण तरीही त्यांचे जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अगोदर उपस्थितांनी मिरजकर तिकटी येथील शेषशायी विष्णूचे दर्शन घेतले, तसेच तेथील क्रांतीस्तंभाला अभिवादन केले. या कार्यक्रमासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच मोठ्या संख्येने हिंदू उपस्थित होते.
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !