केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भ्रष्ट यंत्रणा केली उघड

नागपूर – प्रतिवर्षी खराब होणारे रस्ते नगरसेवक, ठेकेदार आणि अभियंते यांना हवे असतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितले. अब्जावधी भारतियांच्या नशिबी कुणामुळे खड्डेमय रस्ते आले आहेत. कोणती भ्रष्ट यंत्रणा रस्ते खड्ड्यात घालते, हे त्यांनी यातून उघड केले. ‘इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स’, नागपूर शाखेच्या वतीने ‘फॉरेन्सिक सिव्हिल इंजिनिअरिंग’ विषयावरील २ दिवसीय अखिल भारतीय चर्चासत्रात ते बोलत होते.

ते म्हणाले की, ‘खासगी प्रॅक्टिस’ चालत नसलेले अधिवक्ता आणि वास्तूविशारद सरकारकडे आहेत. सरकारी अभियंत्यांमधील ‘चल जाता है’ वृत्ती धोकादायक आहे. या वृत्तीला राजकारणी आणि मंत्रीही उत्तरदायी आहेत. अभियंत्याने त्याच्या कामात तडजोड करायला नको. आयआयटी अभियंते असूनही कामे दर्जेदार होत नाहीत.
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास सुमारे ५६ लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका दान !
पुणे येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पावन तपोभूमीचे अस्तित्व अवैध उत्खननामुळे धोक्यात !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !